आजचे दिनविशेष

20 सप्टेंबर 2022
सुप्रभातम्।
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २८ शके १९४४
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६ :२७ सूर्यास्त : १८ :३७
चंद्रोदय : ०२ :१६, सप्टेंबर २१ चंद्रास्त : १५ :१०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – २१ :२६ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – २१ :०७ पर्यंत
योग : वरीयान् – ०८ :२५ पर्यंत
करण : वणिज – ०८ :१५ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २१ :२६ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मिथुन – १४ :२४ पर्यंत
राहुकाल : १५ :३४ ते १७ :०५
गुलिक काल : १२ :३२ ते १४ :०३
यमगण्ड : ०९ :२९ ते ११ :०१
अभिजितमुहूर्त : १२ :०७ ते १२ :५६
दुर्मुहूर्त : ०८ :५३ ते ०९ :४१
दुर्मुहूर्त : २३ :२१ ते ०० :०८, सप्टेंबर २१
अमृत काल : १८ :२५ ते २० :१३
वर्ज्य : ०७ :३९ ते ०९ :२६
वर्ज्य : ०६ :००, सप्टेंबर २१ ते ०७ :४७, सप्टेंबर २१
अॅनी बेझंट –
‘जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू’ असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. अॅनी बेझंट यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला.
रेव्हरंड फ्रँक या प्रोटेस्टंट पंथाच्या धर्मगुरूरूशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुलेही झाली. पण ती दोघेही वारंवार आजारी पडू लागली. ईश्वरभक्ती व सदाचरणी असूनही मुले आजारी पडतात यामुळे त्यांची ईश्वरावरील श्रद्धा पार उडाली.
पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला व त्यांनी घटस्फोट घेतला. याच काळात विचारवंत चार्ल्स ब्रॅडला यांच्याशी अॅनीशी गाठ पडली. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या. ब्रॅडला यांच्या नॅशनल रिफॉर्मरमध्ये त्यांनी सहसंपादिका या नात्याने अनेक लेख लिहिले. मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी अॅनी ची गाठ पडली. त्यांचा ‘सीक्रेट डॉक्ट्रिन’ हा ग्रंथ अॅनी नीने वाचला. जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अॅनी चा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी १८९३ साली त्या भारतात आल्या. लोकमान्य टिळकांप्रमाणेच त्यांनी ‘होमरूल’ आंदोलन उभारले. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. जन्माने ब्रिटिश असूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्या समाजवादी विचारसरणीच्या होत्या.
इ.स. १८७५ मध्ये चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा ‘द फ्रुटस ऑफ फिलॉसॉफी’ हा प्रबंध लिहिला. या लिखाणाबद्दल दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. जे. कृष्णमूर्तींना त्यांनी आपला मानसपुत्र मानले. भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. शिक्षण, समाजसुधारणा, स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी भाग घेतला व २० सप्टेंबर, १९३३ रोजी या जगाचा निरोप घेतला.
• १९३३ : विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म : १ ऑक्टोबर १८४७)
प्रज्ञाचक्षु’ मधुरदैवताचार्य सतपुरुष गुलाबराव महाराज – त्यांना ‘प्रज्ञाचक्षु’ म्हणतात कारण ते नऊ महीन्याचे असतांनाच त्यांचे दोन्ही डोळयांची दृष्टी गेली. वयाच्या ६व्या वर्षी मातृ छत्र हरपले. रात्रीच्या वेळी ते श्वासावर लक्ष केंद्रित करुन समाधी लावत.
गुलाबराव महाराज
यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. “भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही” हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले.
‘भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत’ असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली.
आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.
‘मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.
गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते.
गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वर्हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले. २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादींचा त्यांत समावेश आहे.
महाराजांनी आपल्या आयुष्यात कशाचा मोह बाळगला असेल तर तो केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा! पत्नीचे एक लुगडे व स्वतःच्या अंगावर बंडी आणि धोतर या शिवाय महाराजांजवळ कुठलीच संपत्ती नव्हती. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले.
पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्नी करीत.. ती दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे.
• १९१५ : विदर्भातील असामान्य अलौकिक संत गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म : ६ जुलै १८८१) (दिनांकाप्रमाणे)
घटना :
१६३३ : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
१९१३ : वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१९४६ : पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९७३ : टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.
१९७७ : व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.
• मृत्यू :
• १८१० : ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.
• १९२८ : केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.
• १९९६ : कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.
• १९९७ : चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू : ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)
• २०१५ : भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म : ३० मे १९४०)
• जन्म :
१८९७ : मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू : ८ जानेवारी १९७३)
१९०९ : गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.
१९११ : भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू : २ जून १९९०)
१९१३ : कवी वा. रा. कांत यांचा जन्म.
१९२१ : क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.
१९२२ : चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.
१९२३ : भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू : २२ जानेवारी २०१४)
१९२५ : थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू : ९ जून १९४६)
१९३४ : इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.
१९३४ : भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू : १६ फेब्रुवारी २०१५)
१९४४ : क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.
१९४६ : भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.
१९४९ : चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.
१९०९ : गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू : १० जून १९०६ – पुणे)
आपला दिवस मंगलमय जावो
- श्री. वासुदेव डोंगरे (लेखक, संकलक, संस्कृत अभ्यासक)