नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे.

कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १०० घेतली होती. १६ महिने त्या सर्व शेतकऱ्यांना सभासद्व देण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.

यासंदर्भात शेतकरी भाऊसाहेब पवार, प्रशांत मगर, अभिषेक गिरमकर,सोमनाथ जाधव, रविंद्र मचाले, सिद्धेश्वर नांद्रे, सुनील जाधव,श्रीकांत मगर, महेश पवार, अनंत पवार व इतर शेतकरी गुरुवारी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर कार्यालय पुढे उपोषणास बसले होते.

सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २२ (२) नुसार सर्व शेतकरी मानीव (डीम्ड मेंबर)सभासद झाले आहेत.त्यानुसार सभासदांची सहकार कायदा नियम उपविधीनुसार कारखान्याने सभासदांना सभासद क्रमांक व भाग दाखले पंधरा दिवसात देण्याचे लेखी आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी कारखाना प्रशासनास दिले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »