शुगर बॅटरी १५ पटींनी जादा पॉवरफुल
डॉ. डॅन राजपूरकर यांची माहिती
Sunday Special
मुंबई : साखरेपासून उत्तम बॅटरी (पॉवर सेल) तयार करण्याचे तंत्रज्ञान आता अधिक प्रगत झाले आहे. ही बॅटरी सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीपेक्षा १५ पटींनी अधिक चांगल्या आहेत, अशी माहिती डॉ. डॅन राजपूरकर यांनी दिली.
आगामी काही वर्षांत जगातील सगळी वाहने साखरेपासून बनवलेल्या बायो बॅटऱ्यांवर चालताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, असा ‘गोड’ संदेशही त्यांनी दिला आहे.
डॉ. राजपूरकर हे गेल्या २५ वर्षांपासून फोटॉनिक्स शास्त्रामध्ये संशोधन करत आहेत. तांदळाएवढा बायो कॅमेऱ्याच्या पेटंटसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या कॅमेऱ्याला लेन्स नसेल, तरी तो सध्याच्या कॅमेऱ्यांपेक्षा पाच लाख पटींनी अधिक कार्यक्षम असेल. अशा कॅमेऱ्यामुळे भविष्यात मोठी क्रांती घडणार आहे, असा दावाही डॉ. राजपूरकर यांनी केला. सध्या माझे आणि एका विदेशी कंपनीचे असे दोन पेटंट अर्ज सादर झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
साखरेच्या ‘पॉवर’बद्दल बोलताना डॉ. डॅन म्हणाले, ‘सध्याच्या लिथियम-आयन तंत्रज्ञानापेक्षा साखरेच्या बॅटरी 15 पट अधिक चांगल्या आहेत. चमचाभर साखरेपासून तयार होणारी ऊर्जा दहा पारंपरिक बॅटऱ्यांएवढी असते. व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि स्टेट युनिव्हर्सिटी येथील सेल-फ्री बायोइनोव्हेशन्सच्या शास्त्रज्ञांच्या चमूने, डॉ. वाय. एच. पर्सिव्हल झांग यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रयोगांमध्ये, साखरेमध्ये असलेले बायो पॉवरचे उच्च गुणधर्म दिसून आले, ज्यामध्ये पदार्थाचे संपूर्ण ऑक्सिडेशन होते.
असे निष्कर्ष अशा प्रयोगांमध्ये यापूर्वी कधीही दिसून आले नव्हते. शंभर टक्के ऊर्जेमध्ये रूपांतरण पाहून हा चमू अवाक् झाला. हा प्रयोग २०१४ चा. त्यानंतर त्यामध्ये खूप संशोधन होत गेले आणि त्यातील उणिवा किंवा त्रुटी दूर करण्यात आल्या. त्यामुळे साखरेपासून पॉवरफुल बॅटरीचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे, असे डॉ. डॅन राजपूरकर म्हणाले.
यापूर्वी २००७ मध्ये जपानच्या सोनी कंपनीने साखरेपासून बॅटरी तयार करण्यात आल्याचे जाहीर केले होते. हिताची कंपनीने अशी बॅटरी वापरून लॅपटॉप कॉम्प्युटरदेखील तयार केला होता. मात्र व्यावसायिक पातळीवर तो बाजारात उतरवण्यात आला नाही. डॉ, डॅन म्हणतात, की साखर आपल्या जैविक शरीराला ऊर्जा देण्याचे काम करू शकते, तर वाहनांना बॅटऱीच्या माध्यमातून का ऊर्जा देऊ शकणार नाही? या तत्त्वावर शास्त्रज्ञांनी काम सुरू केले होते आणि आता त्याला चांगले यश मिळताना दिसत आहे.
विनम्र आवाहन
शुगरटुडे (sugarworld) मॅगेझीन हे साखर उद्योग क्षेत्रातील चांगल्या घडामोडी देणारे आणि अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव नियमित मराठी मॅगेझीन व वेब पोर्टल आहे. साखर क्षेत्र ग्रामीण अर्थकारणाचा कणा तर आहेच, शिवाय शहरी अर्थकारणालाही ऊजा देणारे आहे.
राज्याला आणि देशाला कर रूपाने नियमित अब्जावधींचा महसूल देणारे आहे. अशा या क्षेत्राची चांगली प्रतिमा जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि ती वृद्धिंगत करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
‘शुगरटुडे’ डिजिटल विश्वात कमालीचे लोकप्रिय झाल्याने, गुगलसारख्या माध्यमांनी जाहिरातींसाठी विचारणा केली आहे. मात्र आर्थिक नुकसान झाले, तरी चालेल गुगलच्या जाहिराती वापरणार नाही, असा संकल्प आम्ही सोडला आहे. कारण या जाहिराती मजकुरामध्ये कुठेही उगवतात आणि निखळ वाचनाचा आनंद हिरावून घेतात.
सलग आणि सुबक वाचनाचे समाधान हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या या प्रयत्नांना आपली साथ नक्की मिळेल, या खात्रीसह…
आम्हाला आपण खालील क्यूआर कोड वापरून आर्थिक देणगी देऊ शकता. आपले खूप आभार!