लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्यात शिकाऊ कर्मचाऱ्यांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड ः लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सुशिक्षीत तरुणांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून या हंगामात १०.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामकाजाचा अनुभव यावा व पुढील काळात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शिकाऊ कर्मचारी/कामगार यांची भरती करण्याचे निश्चित केलेले आहे.

तरी कार्यक्षेत्रातील पदवीधर, आय. टी. आय, MSCIT, DTP, H.S.C, SSC उत्तीर्ण असलेल्या इच्छुक तरुणांनी दिनांक १५ जानेवारी २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रे जोडून आपले अर्ज कारखाना कार्यालयास sundersakhar@gmail.com या मेलवर पाठवावेत अथवा समक्ष आणून द्यावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.  दरम्यान, शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाईल. तसेच अधिक माहितींसाठी लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि., सुंदरनगर पो. तेलगांव (बु.), ता. धारूर, जि. बीड येथील श्री. बडे बी. बी. (कामगार कल्याण ऑफिस) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »