महाराजा सयाजीराव गायकवाड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, मार्च ११, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २० , शके १९४६
सूर्योदय : ०६:५० सूर्यास्त : १८:४७
चंद्रोदय : १६:२५ चंद्रास्त : ०५:३८, मार्च १२शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – ०८:१३ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – ०२:१५, मार्च १२ पर्यंत
योग : अतिगण्ड – १३:१८ पर्यंत
करण : बालव – ०८:१३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २०:३९ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कर्क – ०२:१५, मार्च १२ पर्यंत
राहुकाल : १५:४८ ते १७:१७
गुलिक काल : १२:४९ ते १४:१८
यमगण्ड : ०९:४९ ते ११:१९
अभिजितमुहूर्त : १२:२५ ते १३:१२
दुर्मुहूर्त : ०९:१३ ते १०:०१
दुर्मुहूर्त : २३:३६ ते ००:२४, मार्च १२
अमृत काल : ००:३३, मार्च १२ ते ०२:१५, मार्च १२
वर्ज्य : १४:२४ ते १६:०५

  • ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ महाराजा सयाजीराव गायकवाड – २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली.

संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे . गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली.

औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले.

त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

सयाजीराव गायकवाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.

‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे.

१८६३: बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९)

  • घटना :
    १८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
    १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
    १८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
    १९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
    १९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
    २००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.
    २००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
    २०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

• मृत्यू :
• १९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)
• १९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.
• १९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)
• २०१४ : प.पू. रामानंद महाराज गुरु-शिष्य दोन्हींचे प्रतीक ।
• सामावून नाही घेऊ शकले माझ्या अपुर्‍या शब्दांत ।।
• प.पू. रामानंद महाराज यांचे व्यावहारिक नाव श्री. रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. ते लहानपणापासून स्वभावाने शांत, नम्र, प्रेमळ आणि मितभाषी होते. राष्ट्रप्रेमी असल्यामुळे १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होण्यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडली. १९४८ ते १९६४ त्यांनी संघाचे पुष्कळ कार्य केले. पुढे त्यांनी स्वतःला अध्यात्मिक क्षेत्रासाठी वाहून घेतले.
• आज रामानंद महाराज ( इंदूर ) यांची पुण्यतिथी आहे

  • जन्म :
    १९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.
    १९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »