‘सोमेश्वर’ची दहा गावे ‘माळेगाव’ला जोडण्याचा प्रस्ताव नामंजूर
पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्यास साखर आयुक्तालयाने अनुमती नाकारली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रंजन तावरे आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी कारखान्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार आयुक्त शेखर गायकवाड यांनी हा निर्णय दिला आहे.
हा विषय ‘माळेगाव’च्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडला हेाता. त्याला माळेगावच्या सभासदांनी प्रचंड विरोध केला हेाता. ती सभा राज्यात गाजली होती. मात्र, त्या गदारोळात सत्ताधाऱ्यांनी तो विषय आवाजी मताने मंजूर केला होता. त्यास साखर आयुक्तांनी मान्यता न दिल्याने सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसला आहे.