श्री छत्रपती शाहू कारखान्यात पॅनमन पदासाठी भरती

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याकडे ४ पॅनमन पदे त्वरित भरावयाची असून, शैक्षणिक पात्रता व सदर पदावर प्रत्यक्ष काम केलेचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच आपले अर्ज संपूर्ण माहितीसह ०७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा hrshahusakhar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर
श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन, कागल ४१६२१६.
पदाचे नाव – पॅनमन ( पदसंख्या – ०४)
शैक्षणिक पात्रता – पॅन बॉयलिंग कोर्स पास
अनुभव – रिफाईन्ड / सल्फरलेस प्लॅन्टमध्ये कंटिन्युअस / व्हीकेटी पॅन बाँयलिंगचा किमान ०७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणेत येईल.
टीप :- वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असणाऱ्या अनुसूचित जाती/जमाती, प्रकल्पबाधित तसेच मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देणेत येईल.



