इतिहासकार सरदार पणिक्कर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, डिसेंबर १०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १९, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:०२
चंद्रोदय१३:५३ चंद्रास्त०२:३७, डिसेंबर ११
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – ०३:४२, डिसेंबर ११ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – १३:३० पर्यंत
योग : व्यतीपात – २२:०३ पर्यंत
करण : तैतिल – १६:५४ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०३:४२, डिसेंबर ११ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १५:१७ ते १६:३९
गुलिक काल : १२:३१ ते १३:५४
यमगण्ड : ०९:४६ ते ११:०९
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १२:५३
दुर्मुहूर्त : ०९:१३ ते ०९:५७
दुर्मुहूर्त : २३:१४ ते ००:०६, डिसेंबर ११
अमृत काल : ०८:५९ ते १०:३०
वर्ज्य : ००:३९, डिसेंबर ११ ते ०२:०८, डिसेंबर ११

आज मानवी हक्क दिन आहे.

इतिहासकार सरदार पणिक्कर – भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक. त्यांचा जन्म केरळ राज्यातील कोवलम (त्रावणकोर) या ठिकाणी सधन कुटुंबात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण मद्रास येथे घेऊन ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि एम्.ए. व बार ॲट लॉ झाले व भारतात परत आले (१९१९). प्रथम काही वर्षे ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (१९१९–२२) व नंतर कलकत्ता विद्यापीठ (१९२२–२५) यांत व्याख्याते होते. ते पुढे हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक झाले (१९२५). तत्पूर्वी गुरुद्वारा प्रबंधक समितीतील संघर्ष मिटविण्यासाठी त्यांनी म. गांधींना साहाय्य केले. पुढे नरेंद्र मंडळाचे ते सचिव झाले (१९३३) व त्यानंतर ते संस्थानिकांच्या खाजगी नोकरीत शिरले.

काही दिवस पतियाळा संस्थानचे परराष्ट्रमंत्री तर नंतर बिकानेर संस्थानचे ते मुख्यमंत्री होते. १९३० मध्ये ते संस्थानिकांच्या शिष्टमंडळातून गोलमेज परिषदेस हजर राहिले. स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांची संविधान समितीचा सभासद व पुढे संयुक्त राष्ट्रे येथे सभासद म्हणून निवड झाली (१९४८). भारतीय राजदूत म्हणून त्यांनी चीन (१९४८), ईजिप्त (१९५२), फ्रान्स (१९५६) वगैरे देशांत महत्त्वाची कामगिरी बजावली. ते काही दिवस राज्यसभेचे सभासद होते.

उर्वरित आयुष्य त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहून लेखन-वाचन व अध्ययन यांत व्यतीत केले. काही वर्षे काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले व अखेरपर्यंत ते तेथेच होते.
आपल्या इतिहासावरील ग्रंथांत त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाची एक विशिष्ट दिशा दर्शविली आहे. त्यांचे मत, इतिहासाची संकल्पना एकात्म असून तो एकांगी रीतीने अभ्यासला जाऊ नये, असे होते.

इतिहास म्हणचे विशाल व सखोल आवाहन! त्यांनी ऐतिहासिक थोर पुरुष व राष्ट्रे यांचे मनन एका विशिष्ट दृष्टिकोनातून केले आणि भविष्यकाळात या अभ्यासाचा कसा उपयोग होईल, ते सांगितले.
त्यांनी पारंपरिक इतिहासलेखनपद्धती डावलून स्वतंत्र लेखनपद्धती अनुसरली. त्यांच्या व्यासंगाचा उचित सत्कार त्यांना केरळ साहित्य अकादेमीचे अध्यक्षपद देऊन करण्यात आला. याशिवाय यूनेस्कोतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या हिस्टरी ऑफ मनकाइंड (सहावा खंड) या ग्रंथमालेत सहलेखक व सहसंपादक होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे आत्मचरित्र मलयाळम् भाषेत लिहिले असून त्याचे इंग्रजी भाषांतर के. कृष्णमूर्ती यांनी केले आहे (१९७७).

• १९६३: इतिहासकार पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: ३ जून , १८९५)

भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया – आधुनिक भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. त्यांचे सुरुवातीचे बहुतेक शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथमश्रेणीत बी.ए. (१९३०) आणि एम. ए. (१९३२) या पदव्या संपादन केल्या. पुढे ते एलएल.बी.झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठामधून ’गुजरातेतील पुरातत्त्व’ या विषयावर डॉक्टरेट पदवी मिळवली (१९३७). ‘प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, विशेषतः पुराणांचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यासाठी आपण कॉलेजपासूनच प्रेरित झालोʼ, असे सांकलिया यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.

त्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृतची त्यांची ही पार्श्वभूमी त्यांना प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांच्या सखोल अभ्यासात उपयोगी पडली.
भारतात परतल्यानंतर सांकलियांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), द एशियाटिक सोसायटी व हेरास इन्स्टिट्यूट येथे काही काळ काम केले. जुन्या डेक्कन कॉलेजचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर सांकलियांची प्राध्यापक या पदावर नेमणूक झाली (१९३९). सांकलियांनी हे पद स्वीकारणे हा क्षण भारतीय पुरातत्त्वाला निर्णायक वळण देणारा ठरला. गेल्या सहा-सात दशकांमध्ये भारतीय पुरातत्त्वाला जो वैज्ञानिक पाया प्राप्त झाला, त्याला सांकलियांचे द्रष्टेपण कारणीभूत ठरले.
अनेक प्रलोभने नाकारून सांकलियांनी डेक्कन कॉलेजमध्येच राहून संस्थेची जोपासना करणे, विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे व संपूर्ण भारतात पुरातत्त्वीय संशोधन करण्याची परंपरा निर्माण करणे या गोष्टींना प्राधान्य दिले.

त्यांनी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पुरातत्त्वज्ञांनी गेली पन्नास वर्षे भारतीय पुरातत्त्वाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावलेली आहे. सांकलियांचे विद्यार्थी असलेले ज्येष्ठ पुरातत्त्व-अभ्यासक के. पदय्या यांनी सांकलियांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुढील गौरवोद्गार काढले आहेत : “Through his many-sided efforts, he sought to imprint the study of the past onto national consciousness.” यावरून सांकलियांची एकूण जीवनदृष्टी व त्यांची राष्ट्रवादी प्रेरणा समजते.

प्रागैतिहासिक स्थळांचे सर्वेक्षण व संशोधन करत असतानाच सांकलियांचे लक्ष इतर सांस्कृतिक अवशेषांकडे होतेच. सांकलियांनी संशोधनाला प्रारंभ केला तेव्हा प्रागैतिहासिक व ऐतिहासिक कालखंडांमध्ये मोठी पोकळी होती. तत्कालीन भारताच्या वायव्य भागात सिंधू संस्कृतीच्या स्थळांचा शेाध लागल्याने काही प्रमाणात ही पोकळी कमी झाली होती. तसेच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन कुऱ्हाडी (celts) मिळाल्या होत्या; तथापि प्रागैतिहासिक काळ व गंगा-यमुना खोऱ्यातील चित्रित मृद्भांडी वापरणाऱ्या ग्रामीण संस्कृतींच्या काळादरम्यान काय घडले, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज होती. सांकलियांनी या संदर्भात मोलाची भूमिका बजावली.
पुरातत्त्वीय पुरावे व लिखित साधने एकत्रितपणाने वापरली पाहिजेत, असा सांकलियांचा आग्रह होता. वैयक्तिक जीवनात धार्मिक असूनही त्यांनी लिखित साधनांमध्ये ऐतिहासिक सत्य असतेच, असे आंधळेपणाने कधीच मानले नाही. त्यांनी लिखित साधनांमधील सत्य शोधण्यासाठी व नंतरच्या काळात घुसलेले भाग (interpolation) ओळखण्यासाठी रामायणाचे सखोल संशोधन केले.

रामायणाच्या लिखित संहितेमधील अंतर्गत पुरावे व पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालून त्यांनी रामायणाच्या रचनेचा काळ निश्चित केला. तो इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापूर्वी फार मागचा नसावा, असे अनुमान त्यांनी काढले. रामायणात उल्लेख असणारी लंका ही आजचा श्रीलंका देश नसून ती मध्य भारतात एका छोट्या बेटावर होती, असे त्यांनी प्रतिपादन केले. सांकलियांच्या या मताला असणाऱ्या पुराव्यांचा विचार न करता अनेकांनी या मताला विरोध केला, तर काहींनी वृत्तपत्रीय लेखनातून सांकलियांची चेष्टाही केली; तथापि आजही त्यांच्या या संशोधनातील अनेक मुद्दे खोडून काढता येत नाहीत.

१९०८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.( मृत्यू : २८ जानेवारी, १९८९.)

  • घटना :
    १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.
    १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
    १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
    १९०९ : स्वा. सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनाऱ्यावर ” ने मजसी ने परत मातृ भूमीला ” गीत रचले
    १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
    १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
    २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

• मृत्यू :

• १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)
• १९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर, १८९४)
• १९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट, १९०५)
• २००१: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर , १९११)
• २००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन. (जन्म : २७ जून , १९३० )
• २००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर , १९३८)

  • जन्म :
    १८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे, १९५८)
    १८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल भारतरत्न चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

१८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी , १९६७ )
१८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च, १९३७)
१९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »