अद्याप ९० लाख टन ऊस शिल्लक
पुणे: राज्यात यंदा उसाचे (Sugarcane) विक्रमी गाळप करूनही अद्याप ९० लाख टन ऊस (Sugar) उभा आहे. शिल्लक उसाच्या गाळपासाठी (Sugarcane flour) मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर पाठविले जात असून, साखर आयुक्त शेखर गायकवाड सातत्याने नियोजनाचा आढावा घेत आहेत.
राज्यातील शिल्लक उसाच्या गाळपासाठी बारकाईने नियोजन सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक भागातील हार्वेस्टर आता बीड, जालना, लातूर, नांदेड भागात पाठविले जात आहेत. अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी नियोजनानुसार काही कारखाने अजून एक ते दीड महिना चालविले जाणार आहेत.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
गाळपासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक
‘‘शिल्लक उसाचे पूर्ण गाळप (Sugarcane flour) करणे हे आमचे सध्याचे सर्वांत मोठे आव्हानात्मक उद्दिष्ट आहे. त्यासाठी खासगी, सहकारी कारखाने, वाहतूकदार व तोडणी मजुरांचे प्रतिनिधी, हार्वेस्टर चालक आणि साखर आयुक्तालय असे एकत्रितपणे नियोजन करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडी आटोपल्यानंतर रिकामे झालेले ५०-६० हार्वेस्टर तातडीने शिल्लक उसाच्या जिल्ह्यांकडे रवाना केले जात आहेत,’’ अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
कोल्हापूर, सांगली भागांतील कारखाने ( Sugar Cane Factory Close) बंद झाल्यानंतर तेथील हार्वेस्टरचे चमू आता शिल्लक ऊस कापण्यासाठी विविध जिल्ह्यांकडे पाठविले जात आहेत. शिल्लक उसाच्या भागातच उन्हाचा (Summer) पारादेखील वाढतो आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई तयार होत आहे. त्यामुळे हार्वेस्टरच्या नियोजनासाठी आता धावपळ सुरू आहे.
राज्यात (State) चालू हंगामात उपलब्ध उसाबाबत साखर आयुक्तालयाचा सुरुवातीचा अंदाज ११०० लाख टनांच्या आसपास होता. मात्र ऊस अपेक्षेपेक्षाही जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर हा आकडा १२०० लाख टनांपर्यंत गेला. परंतु मराठवाड्याच्या काही भागांत भरमसाट ऊस असल्याने उसाची एकूण उपलब्धता आता १२५० लाख टनांच्याही पुढे गृहीत धरण्यात आली आहे.
गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांनी याच कालावधीत ९७९ लाख टन ऊस गाळला होता. यंदा मात्र ७ एप्रिलपर्यंत हाच आकडा ११६७ लाख टनावर गेलेला आहे. ‘‘आमच्या मते राज्यातील एकूण ऊस १२५० लाख टनांच्या पुढे आहे. त्यामुळे अजून ८० ते ९० लाख टन ऊस शिल्लक असावा. त्यामुळे आम्ही बारकाईने नियोजन करीत आहोत. शिल्लक उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यासाठी साखर कारखाने (Sugar Factory) एकमेकांना मदत करीत आहेत,’’ असे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
राज्यातील उसाचे एकूण गाळप ११६० लाख टनांच्या पुढे गेले आहे. गेल्या हंगामापेक्षाही सध्याचे गाळप १८७ लाख टनांनी जादा झालेले आहे. पूर्वी ऊस शिल्लक असल्याचे निदर्शनास येताच खूप धावपळ आणि आणीबाणीची स्थिती तयार होत असे. यंदा मात्र कारखाने (Factory) नसलेल्या जिल्ह्यातील ऊस भराभर इतर जिल्ह्यांकडून वाहून नेला जात आहे. उस्मानाबादमधील सर्व ऊस सोलापूरचे कारखाने नेत आहेत. लातूर व बीडचा अतिरिक्त ऊसदेखील सोलापूर भागातील कारखाने नेत आहेत.
‘लाल यादी’त २८ कारखाने
सोलापूरच्या पंढरपूर भागातील कारखाने (Factory) बंद होण्याच्या मार्गावर असले तरी याच जिल्ह्यातील काही कारखाने महिनाभर चालतील. कारण, इतर जिल्ह्यातील शिल्लक ऊस या कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात गाळपासाठी आणला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासे भागाला लागून असलेले ज्ञानेश्वर, मुळा असे कारखाने अतिरिक्त उसामुळे महिनाभर चालण्याची चिन्हे आहेत. या कारखान्यांना जालना व बीड भागातील अतिरिक्त ऊस (Sugarcane) पुरवला जात आहे.