आजचे पंचांग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, जुलै ५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १४, शके १९४७
सूर्योदय : ०६:०६
सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १४:४३
चंद्रास्त : ०२:०६, जुलै ०६
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – १८:५८ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १९:५१ पर्यंत
योग : सिद्ध – २०:३६ पर्यंत
करण : गर – १८:५८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : ०९:२४ ते ११:०४
गुलिक काल : ०६:०६ ते ०७:४५
यमगण्ड : १४:२२ ते १६:०२
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:१०
दुर्मुहूर्त : ०६:०६ ते ०६:५९
दुर्मुहूर्त : ०६:५९ ते ०७:५२
अमृत काल : ०९:५७ ते ११:४५
वर्ज्य : ०२:०७, जुलै ०६ ते ०३:५४, जुलै ०६

कादंबरीकार चंद्रकांत सखाराम चव्हाण – बाबूराव अर्नाळकर मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले.

१९४२च्या चळवळीत तुरुंगात असताना ’सामान्य माणसासाठी लिही’ असे बाबूरावांना सांगण्यात आले. सामान्य माणसाकरिता लिहायचे म्हणजे काय हे बाबूरावांना पडलेले कोडे होते. बाबूरावांना नाटकाची आवड होती. एका नाट्यक्लबाचे ते सभासद होते. त्या नाट्यक्लबातून ते एकदा विजयदुर्ग किल्ल्यात गेले. आणि परत आल्यावर त्यांनी ’सतीची समाधी’ नावाची गोष्ट लिहिली; ती अस्नोडकरांच्या ’करमणूक’मधून प्रसिद्ध झाली.

त्याच दिवशी बाबूरावांना नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर भेटले. छान गोष्ट आहे, ते म्हणाले. एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली आहे असे म्हणून ते बाबूरावांना नाथ माधव यांच्याकडे घेऊन गेले. नाथ माधवांनी अशाच रहस्यकथा लिही असे सुचवले. बाबूरावांनी मग लेखणी हाती घेतली, ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही.
येरवड्याच्या तुरुंगात असताना विसापूरच्या तुरुंगातील काही राजकीय कैद्यांनी लढा देऊन सर्वच तुरुंगांतील राजकीय कैद्यांना वाचनासाठी पुस्तके पाठवावयास शासनाला भाग पाडले. अशा काही पुस्तकांतून एडगर वॅलेस यांची ’थ्री जस्ट मेन’ ही कथा बाबूराव अर्नाळकर यांच्या हाती पडली. आणि सामान्यांसाठी काय लिहायचे ते समजले.

बाबूरावांचे स्नेही प्रभू हे रहस्यमाला काढीत असत. १९४२च्या फेब्रुवारीत बाबूरावांनी लिहिलेली ’चौकटची राणी’ ही पहिली रहस्यकथा पुस्तकरूपाने प्रकाशित झाली, आणि बाबूरावांना ४० रुपये मानधन मिळाले.

याच सुमारास चिदरकर यांनी एक माला काढली होती त्या मालेत क्रमाने सात कथा लिहिल्यानंतर बाबूराव परत प्रभूंसाठी कथा लिहू लागले.

बाबूरावांच्या कथांना पाश्चात्त्य कथांचा आधार असायचा, पण त्या कथांना मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. कथेत कुठेही अश्लीलपण येऊ न देण्याची खबरदारी बाबूराव घेत आणि कथेचा शेवट नेहमी ’सत्यमेव जयते’ असाच असे. कथेतील प्रसंग वेगळे असले तरी नायक एकच ठेवायचा हे बाबूरावांनी निश्चित केले होते.
नायकाचे नाव बाबूरावांना गीता वाचताना सुचले आणि त्यांनी धनंजय हे नाव मुक्रर केले. बाबूरावांचा कथानायक रुबाबदार, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असल्याने वाचकांना त्याच्या गु्णविशेषांची, वागण्याची, बोलण्याचालण्याची चांगलीच ओळख असे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्यामुळे इ.स. १९४६ ते १९४८ या काळात बाबूराव सैन्यात दाखल झाले होते. त्या काळात त्यांच्या कथालेखनात खंड पडला. परत आल्यानंतर परत त्यांनी प्रभूंच्या कथामालेकरिता रहस्यकथा लिहायला सुरुवात केली.

बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत. वयाच्या ५५व्या वर्षी बाबूरावांनी चष्म्याचे दुकान बंद केले.

पुढे पुढे रहस्यकथा वाचायची वाचकांची आवड कमी होऊ लागली आणि वयाने अतिवृद्ध झालेल्या बाबूरावांच्या पुस्तकांचा खप रोडावला, पण त्यांचे रहस्यकथा लिहिणे थांबले नाही. प्रकाशक दर आठवड्याला येत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके मानधन देऊन घेऊन जात, पण त्यांपैकी अनेक पुस्तके प्रकाशकाने प्रसिद्धच केली नाहीत. बाबूरावांना हे त्याने कधीच कळू दिले नाही.
बाबूराव अर्नाळकरांनी इ.स. १९३७ ते १९४२च्या दरम्यान ’मराठ’ नावाचे एक मासिक चालवले होते.

१९९६: रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन. (जन्म: ९ जून १९०६)

‘बिहार विभूती’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्म १८ जून १८८७ रोजी गया, बिहार येथे झाला. त्यांचा राजकीय प्रवास बिहारच्या राजकीय इतिहासाला आकार देणारा मानला जातो .

सिन्हा यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्या गावी पूर्ण केले आणि १९१४ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून इतिहासात एमए घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांच्या एमएनंतर, सिन्हा यांची टीएन जे कॉलेज, भागलपूरमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी भागलपूरमध्ये पूर मदत कार्य आयोजित केले. १९१६ मध्ये त्यांनी पाटणा बारमध्ये प्रवेश घेतला.

सिन्हा हे गांधींचे कट्टर अनुयायी होते ज्यांनी त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी बिहारमधील सत्याग्रह आंदोलनांचे नेतृत्व केले. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. १९२२ मध्ये त्यांनी गया काँग्रेस संघटित करण्यात मदत केली . एका वर्षानंतर ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बनले. त्यानंतर लगेचच त्यांची बिहार काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून निवड झाली.

काँग्रेस पक्षातील त्यांच्या प्रशासकीय भूमिकांव्यतिरिक्त, सिन्हा यांनी महत्त्वपूर्ण राजकीय भूमिकाही बजावली – ते १९३५ मध्ये सहाबाद-कम-पाटणा मतदारसंघातून केंद्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. एका वर्षानंतर ते बिहार विधानसभेचे सदस्य झाले आणि बिहार प्रांताचे उपप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दुसऱ्या महायुद्धात भारताच्या सहभागाचा निषेध करत १९३९ मध्ये बिहार विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये भूकंप मदत कार्यक्रमांवर काम केले.

१९३० मधील सविनय कायदेभंग चळवळ आणि सत्याग्रह ( १९४० – ४१ ) यांसारख्या अनेक राजकीय चळवळींमध्ये सिन्हा सामील होते ज्यामुळे त्यांना अटक झाली.

सिन्हा १९४६ मध्ये बिहारमधून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर संविधान सभेवर निवडून आले होते. विधानसभेतील वादविवाद आणि चर्चेत ते सक्रियपणे सहभागी झाले नाहीत.

बिहारमधील राजकीय दिग्गज, सिन्हा १९५२ मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या बिहार विधानसभेवर निवडून आले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कृष्णा सिन्हा यांच्यासह बिहारमधील अनेक विकास प्रकल्पांचे नेतृत्व केले , ज्यात अनेक नदी खोरे प्रकल्पांचा समावेश आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत त्यांचे विकास कार्य कृषी क्षेत्रावर केंद्रित होते आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल केंद्र सरकारने त्यांचे कौतुक केले.

सिन्हा यांचे कार्य भारताच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंत विस्तारले – त्यांनी नेपाळमध्ये भारतीय अन्न आणि कृषी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि कॅनडा आणि स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

५ जुलै १९५७ रोजी सिन्हा यांचे निधन झाले. बिहारमधील सर्वात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून ते आजही स्मरणात आहेत. अनुग्रह स्मारक निधी (अनुग्रह मेमोरियल फंड) चे अध्यक्ष म्हणून काम केलेले जयप्रकाश नारायण म्हणाले की सिन्हा हे एक दुर्मिळ आत्मा होते ज्यांचे योगदान चिरंतन आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल विभागाने तिकीट काढले .

• १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून, १८८७)

  • घटना :
    १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
    १८११: व्हेनेझुएला देशाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
    १९५०: जगातील ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला देण्यात आला.
    १९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
    १९७५: भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
    १९७५: केप व्हर्डे देशाला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
    २०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.

• मृत्यू :
• १९८०: कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल, १८९६)
• १९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे, १९१२)
• २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
• २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर . १९२४)

  • जन्म :
    १८८२: भारतीय शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी१९२७)
    १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
    १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)
    १९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)
    १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२० )
    १९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)
    १९५७ : मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार अशोक हांडे यांचा जन्म.
    १९९५ : अर्जुन पुरस्कारानं सन्मानित बॅडमिंटन खेळाडू पुसर्ला वेंकट तथा पी. वी. सिंधू यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »