उसापासून रम बनते कशी?
रम स्पिरीट हा कॅरिबियन बेटांवरील समुद्री चाच्यांचा समानार्थी शब्द आहे … परंतु हे विदेशी अमृत ऊस ते तुमच्या काचेचया ग्लासपर्यन्त कसा प्रवास करटे, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
रमचा प्रवास सुरू होतो ब्राझील, भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या ठिकाणी होणाऱ्या उप-उष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशातील ऊसापासून. विहंग नजरेतून, हे पीक लांब, बिलोवी, मऊ हिरव्या गवताच्या संघटित पंक्तीसारखे दिसते. लांब पाने आणि पंख असलेली फुले , जोडलेले परंतु मोहक तंतुमय देठ असे हे पीक 7-मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते.
दक्षिण आफ्रिकन शुगर असोसिएशनच्या मते, तिकडे सुमारे 20,000 लहान-उत्पादक, 1,000 मोठ्या प्रमाणात आणि सुमारे 100 मिलर-कम-लावणी करणारे आहेत. स्टॅटिस्टा अहवाल सांगतो की रम विभागातील महसूल 2022 मध्ये $41.3 दश लक्ष इतका आहे आणि 2022 आणि 2025 दरम्यान दरवर्षी 21.4% ने वाढण्याची अपेक्षा आहे.
मोरेलो रम
ऊसाच्या शेतात परत एकदा पीक काढणीसाठी तयार झाले की, त्याची पाने आणि शेंडे कापले जातात आणि नंतर त्याचे तुकडे केले जातात. BlackTailNYC ने (थंड अल्कोहोलिक शीतपेयांशी संबंधित सर्व गोष्टींसाठी एक व्यासपीठ) उल्लेख केल्याप्रमाणे, आधुनिक रम बनवण्याची एक सामान्य पद्धत म्हणजे उसाचा रस काढल्यानंतर तो आंबवणे, त्याला वॉश सिरपही म्हणतात. तसेच , तुम्ही रसाचे मोलॅसिसमध्ये रूपांतर करू शकता आणि नंतरही ते आंबवू शकता. नंतर हे द्रव पॉट स्टिलमध्ये टाकला जातो आणि डिस्टिल्ड केला जातो. ही झाली प्रारंभीक रम. ती आणखी दर्जेदार करण्यासाठी पुन्हा डिस्टिल्ड केली जाते. तर काहींना आणखी परिपक्वता हवी असते, शा दर्दी मंडळीसाठी ती काही वर्षे साठवली जाते. जेवढे तिचे वय अधिक तेवढी ती अधिक चवदार आणि दर्जेदार..
ऊस कोणता होता, तो कोणत्या प्रदेशातला होता, तो परिसर कसा होता आदी घटकांचा रमच्या चवीवर प्रभाव पडतो, हे विशेष उल्लेखनीय. – आता येथे आपण क्राफ्ट रमबद्दल बोलत आहोत – ऊसाची कापणी, जमीन आणि रस कसा काढला जातो आदींचा अंतिम उत्पादनावर परिणाम होतो. लाकडी बॅरल्स किंवा कास्क (किंवा अगदी स्टेनलेस स्टील) च्या निवडीसाठीही हेच लागू होते, म्हणून जास्त काळ मुरवायची रम किंवा विस्की लाकडी पिंपांमध्येच अनेक वर्षे ठेवली जाते .
तुम्ही पुढच्या वेळी Mojito किंवा Piña Colada यासारख्या रम ऑर्डर कराल तेव्हा तुमच्या मनात ऊसाची हिरवीगार शेती नक्की येईल. म्हणा चीअर्स, चांगभले.
Courtesy – News24