कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली
सांगली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर वीज नियामक आयोगाने घटवण्याचा घाट घातला आहे. सध्याचा ६.६४ रुपये दर घटवून ५.४७ रुपये प्रतियुनिट दिला जाणार आहे.
गेल्या व चालू हंगामात प्रत्यक्षात वीजदर ६.६४ रुपये मिळाला मात्र, नवे दर १ एप्रिल २०२० पासून लागू केले जाणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांत कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली समान सहा हप्त्यात केली जाणार आहे. वीज खरेदी दरात वाढीची अपेक्षा असताना वीज आयोगाने स्वतःहून मसुदा काढून कारखान्यांना धक्का दिला आहे. या मसुद्यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत.