गणेश जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, जानेवारी २२, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २, शके १९४७
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२६
चंद्रोदय : ०९:३४ चंद्रास्त : २१:४०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ०२:२८, जानेवारी २३ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – १४:२७ पर्यंत
योग : वरीयान् – १७:३८ पर्यंत
करण : वणिज – १४:४० पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०२:२८, जानेवारी २३ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १४:१४ ते १५:३८
गुलिक काल : १०:०२ ते ११:२६
यमगण्ड : ०७:१५ ते ०८:३९
अभिजित मुहूर्त : १२:२८ ते १३:१२
दुर्मुहूर्त : १०:५८ ते ११:४३
दुर्मुहूर्त : १५:२७ ते १६:११
अमृत काल : ०६:३१, जानेवारी २३ ते ०८:०७, जानेवारी २३
वर्ज्य : २०:५२ ते २२:२९

“ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः”

लिंगपुराण – लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.

आज तिलकुंद चतुर्थी – गणेश जन्म आहे.

मार्कंडेय जयंती हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे, जो महान संत आणि अमर ऋषी मार्कंडेय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ही जयंती साजरी केली जाते. या दिवशी भक्त ऋषी मार्कंडेय यांची पूजा करतात आणि भगवान शिव यांची पूजा करतात.

मार्कंडेय ऋषी हे त्यांच्या ज्ञान, तपश्चर्या आणि भगवान शिवावरील अनन्य भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची कथा आपल्याला शिकवते की खऱ्या भक्तीने आणि तपश्चर्येने मृत्यूलाही पराभूत करता येते.

मार्कंडेय हे भारतातल्या पद्मशाली समाजाचे दैवत आहेत .

आज मार्कंडेय ऋषी जयंती आहे.

।। देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती ।। ह्या उक्तीनुसार शेकडो वर्ष श्रीराम मंदिरासाठी लढा देणारे, प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व श्रीराम भक्तांना मन:पूर्वक प्रणाम.

याचेच विजयश्रीत रुपातंर म्हणजेच ” श्रीराम मंदिर अयोध्या ” येथे आज २२ जानेवारी, २०२४ रोजी. सकाळी १२.२९ ते १२.३० दरम्यान प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती झाली. आणि मंदिर लोकार्पणाचा सोहळा पार पडला.

ह्या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार म्हणुन देशभरातील नागरिकांनी पूजा पाठ, मंगल कार्यक्रम साजरे करून आनंद व्यक्त केला. देशभर राममय वातावरण झाले. (तिथी पौष शु पौर्णिमा )

।। जय श्रीराम ।। जय जय श्रीराम ।।

स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.

हैद्राबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या दहशतवादी संघटनेने मराठवाडा हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.

‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते.

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

  • घटना :
    १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
    १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
    १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
    १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
    १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
    २००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
    २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

• मृत्यू :

• १९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर , १८९४)

  • जन्म :
    १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
    १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म. ( मृत्यू : ६ जानेवारी, १९८० )
    १९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म. ( मृत्यू :१५ ऑक्टोबर, १९७२ )
    १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
    १९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी , १९९४)
    १९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)
    १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००३)
    १९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
    १९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »