गुरुनानक जयंती

Today is Gurunanak jayanti

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज बुधवार, नोव्हेंबर ५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १४, शके १९४७
सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:०३
चंद्रोदय : १७:४६ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माहकार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – १८:४८ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – ०९:४० पर्यंत
क्षय नक्षत्र : भरणी – ०६:३४, नोव्हेंबर ०६ पर्यंत
योग : सिद्धि – ११:२८ पर्यंत
करण : विष्टि – ०८:४४ पर्यंत
द्वितीय करण : बव – १८:४८ पर्यंत
क्षय करण : बालव – ०४:५१, नोव्हेंबर ०६ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १२:२२ ते १३:४७
गुलिक काल : १०:५७ ते १२:२२
यमगण्ड : ०८:०६ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : ११:५९ ते १२:४५
अमृत काल : ०२:२३, नोव्हेंबर ०६ ते ०३:४७, नोव्हेंबर ०६
वर्ज्य : १८:०१ ते १९:२५

त्रिपुरी पौर्णिमा – उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते.
या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.

आज त्रिपुरी पौर्णिमा आहे .

श्रीशिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्रीगजानानचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी यांच्या दर्शनाचा योग “कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र” या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिकेय ये बल, बुध्दी, साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे “धनसंपत्तीकारक” ही मानले गेले आहे.

आज कार्तिक स्वामी दर्शन दिन आहे.

गुरू नानक देव- हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.

सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली. गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.

त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.

आज गुरुनानक जयंती आहे.

पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी व जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. पक्ष्यांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी राज्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो.

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबरला, तर ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोंव्हेंबरला असते. नोव्हेंबर महिना परदेशातील, हिमालायतील स्थलांतरित पक्षी महाराष्ट्रात येण्याचा काळ आहे. या सगळ्याचे औचित्य साधून या सप्ताहाला पक्षी संवर्धनाची जोड दिली आहे.

५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

कै .विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ” सीता स्वयंवर ” हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. ह्याचे औचित्य साधून १९४३ पासून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन प्रारंभ झाला.

आज मराठी रंगभूमी दिन आहे.

|| अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे ||
|| मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे ||
|| भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे ||
|| इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे ||

१९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर, २०००)

देशबंधू चित्तरंजन दास – हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते होते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १८७० रोजी कोलकाता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय. सी. एस. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन त्यांनी मॅक्लिनचा निषेध केला.

नंतर बॅरिस्टर होऊन ते भारतात परतले (१८९३). विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कोलकात्यास वकिलीस प्रारंभ केला. चित्तरंजन यांनी या काळात ‘मालंच’ (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात त्यांचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.
१८९७ मध्ये वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले.

अलीपूर बॉम्बकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडा-गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले (१९०८). त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक खटले विनामूल्य चालविले.
स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदू-मुस्लीम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटित आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. अशा या महान कायदे पंडितांचे १६ जून १९२५ रोजी निधन झाले.

१८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून, १९२५)

  • घटना :

१८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.
१८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
१८४३: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.
१८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
१९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
१९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
२००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

• मृत्यू :

• १९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट, १८४५)
• १९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.
• १९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.
• २०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर, १९२६)

  • जन्म :
    १८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून, १९२५)
    १८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर, १९६४)
    १९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर , १९७३)
    १९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट, २००७)
    १९३०: भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च, २०११)
    १९३२: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.
    १९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.
    १९५५: पत्रकार करन थापर यांचा जन्म.
    १९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »