तुमचं तुम्हीच ठरवा!
घरभेद्यांचा घरामध्येच करू मसाला |
बाहेरचा दरवाजाला आनंदाने खोला ||
आपल्या झाकल्या मूठीत सव्वालाख ठेवा|
झाका अथवा उघडा हे तुम्हीच ठरवा ||१||
तुमच्यात जर एकीचं बळ नसेल|
तर आमजनता तुम्हालाही लुबाडेल ||
का मतभेदांचा तमाशा लोकांना दाखवा|
मतभेद हवे नको हे तुम्हीच ठरवा ||२||
राऊळामध्ये वाचला सुविचार बरवा|
चपला आणि कुविचार बाहेरच ठेवा||
देवदर्शन करा अथवा भोज्याला शिवा|
देव दर्शनार्थी तुमचं तुम्हीच ठरवा ||३||
काटाकाटीत सदा काटला जातो तो दोरा|
तरीही म्हणे पतंग काटला खरा खरा||
माणूस कधी चुक नसतो हेच दाखवा|
पतंग काटला की दोरा,तुम्हीच ठरवा ||४||
नेता व्हायचं,काका मामा भाऊ ठेवा दूर|
गोरगरीब जनतेची दुःख करा दूर ||
आधी सज्जन माणूस ओळखायला हवा|
वाल्या होता की वाल्मिकी हे तुम्हीच ठरवा ||५||
पावसाने झोडले आणि राजानं मारलं|
तक्रार कुठे करायची विमा कंपनीला||
सरकारचा एक रूपयात विमा हवा|
फसले की फसविले हे तुम्ही ठरवा ||६||
रचनाकार:
आहेर वाळू रघुनाथ नाशिक . (बीई, एमआयई, बीओई)