निर्यात ८५ लाख टन होण्याचा इस्माचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चालू साखर हंगामात भारताची साखर निर्यात ८५ लाख टन होण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) सोमवारी (ता.४) साखर निर्यातीचा अंदाज जाहीर केला. देशातून आतापर्यंत ७२ लाख टन निर्यातीचे करार झाले असून मार्चअखेर ५६-५७ लाख टन साखरेची निर्यात झाल्याची माहिती इस्माने (ISMA) दिली आहे.

मार्चअखेरपर्यंत देशातील ३६६ साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप (Sugarcane Crushing) सुरू होते, तर १५२ कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. साखर उत्पादनाची ताजी आकडेवारी (Latest Figure Of Sugar Production) जाहीर करताना इस्माने म्हटले की, ”चालू हंगामात जागतिक बाजारपेठेत भारताकडून ८५ लाख टन साखर निर्यातीची (Expected Sugar Export) अपेक्षा असून आंतरराष्ट्रीय व्यापारी (International Trade) संस्थांकडून तसे संकेत मिळत आहेत.

साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात
इस्माच्या माहितीनुसार, चालू विपणन हंगामात (२०२१-२२) (Sugar Marketing Year) देशातील साखरेचे उत्पादन (Sugar Production) ३०९.८७ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशातील साखर उत्पादन २७८.७१ लाख टन इतके होते. साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख साखर उत्पादक राज्ये आघाडीवर आहेत.

इस्माच्या आकडेवारीनुसार, यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढले आहे. मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्रात ११८.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील हंगामात याच कालावधीत १००.४७ लाख टन होते. साखर उत्पादनात महाराष्ट्राचा स्पर्धक असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा साखर उत्पादन घटल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च अखेरीस ९३.७१ लाख टन साखर उत्पादित करणाऱ्या उत्तर प्रदेशात यावर्षी ८७.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे.साखर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात ५७.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.


इथेनॉलच्या ४१६.३३ कोटी लिटर पुरवठा मागणीवर बोलताना इस्माने सांगितले की, २७ मार्चपर्यंत १३१.६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा (Ethanol Supply) करण्यात आला आहे. तेल कंपन्यांच्या (Oil Marketing Companies) ४१६ कोटी लिटर इथेनॉल मागणीच्या तुलनेत आजअखेर ४०२.६६ कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. तसेच डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान देशाने इथेनॉल मिश्रणाच्या एकूण टक्केवारीच्या सरासरी ९.६० टक्के लक्ष्य गाठले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »