पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला
बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परभणी, 11 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर परभणी येथे धनंजय मुंडे यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ही परभणी दौऱ्यावर होते. परभणीचं पालकमंत्रिपद मिळाल्यावर धनंजय मुंडे परभणी जिल्ह्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेवर धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, ज्या कोणी कमिटमेंट केली आहे ते शोधणं पत्रकारांचं काम आहे. कोणी किती निधी, किती काम केलं. माझी कमिटमेंट ही मातीतल्या माणसांसाठी काम करत राहणे ही आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पत्रकारांच्या कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पंकजा मुंडे यांनी “एक बार मी कमिटमेंट केली की ती मी पूर्ण करते” असे म्हणत धनंजय मुंडे यांना टोला लगावला. बीड जिह्यातील परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकार संपादक पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, माझ्या काळात मी विकासाची एवढी कामे केली तशी माझी व्याप्ती ही व्यापक होती फक्त मी कामे आनात राहिले. पंकजा मुंडे कोणाला बोलत नाहीत त्या खूप घमंडी आहेत त्याच्या घराचा दिवा नेहमी बंदच असतो ह्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या त्याचा परिणाम एवढा झाला की लोकांना खरच वाटू लागले की पंकजा मुंडे छापून आल्या प्रमाणे आहेत.
सर्वात जास्त साखर कारखाने अजित पवारांनी बुडवले : पंकजा मुंडे
साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. बीडच्या केस तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर टीका केली होती. टीका करताना अजित पवार म्हणाले होते, कारखाना चालवण्यासाठी कर्तृत्व लागते येरागबाळ्याचं काम नाही. त्यावर प्रत्युत्तर देताना शनिवारी पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.