प्रवासी भारतीय दिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जानेवारी ९, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १९, शके १९४७
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१७
चंद्रोदय : ००:०१, जानेवारी १० चंद्रास्त : ११:२७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – १३:४० पर्यंत
योग : शोभन – १६:५६ पर्यंत
करण : विष्टि – १९:३९ पर्यंत
द्वितीय करण : बव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कन्या
राहु काल : ११:२३ ते १२:४६
गुलिक काल : ०८:३७ ते १०:००
यमगण्ड : १५:३१ ते १६:५४
अभिजित मुहूर्त : १२:२४ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०९:२७ ते १०:११
दुर्मुहूर्त : १३:०८ ते १३:५२
वर्ज्य : २२:४६ ते ००:३०, जानेवारी १०

प्रवासी भारतीय दिवस ९ जानेवारीला साजरा केला जातो. कारण ९ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते. भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाने जे योगदान दिले आहे ते दर्शवणे हे आजचे मूळ उद्दिष्ट आहे.
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हा परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. अनिवासी भारतीय, भारतीय मूळ व्यक्ती, संस्थापक, संस्था किंवा अनिवासी व्यक्तींनी स्थापित केलेल्या आणि चालविणाऱ्या संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

हे पुरस्कार २००३ पासून आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या परराष्ट्र समुदायाच्या सहभागास मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्यासाठी हा पुरस्कार प्रत्येक २ वर्षात साजरा केला जातो.

आज प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस आहे.

दिन है सुहाना आज पहली तारीख है |
खुश है ज़माना आज पहली तारीख है ||
पहली तारीख, अजी पहली तारीख है – कमर जलालाबादी

२००३: गीतकार व कवी ओमप्रकाश भंडारी उर्फ कमर जलालाबादी यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी, १९१७ )

“आपण आपल्या पृथ्वीवर अत्याचार करत आहोत, निसर्गावर अत्याचार करत आहोत. आपण निसर्गाचे खाटिक झालोत”, एका मुलाखतीत सुंदरलाल बहुगुणा सांगत होते.
आज उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टिहरीमध्ये १९२७ साली सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म झाला. सालवृक्ष, ओकवृक्ष यांनी वेढलेल्या झाडा-झुडुपांनी समृद्ध अशा निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं बालपण गेलं.

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी झाडांना मिठी मारायला शिकवणारा अवलिया, म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखतं. १९७० च्या दशकात उत्तर भारतात सुरू झालेल्या चिपको आंदोलनातले ते महत्त्वाचे नेते होते. ‘चिपको’ म्हणजे ‘मिठी मारणे’.
सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांचे सहकारी चांदी प्रसाद भट्ट यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो स्त्री आणि पुरुषांनी सर्व बाजूंनी साखळी करत झाडांना मिठी मारून वृक्षतोडीपासून वाचवलं आहे. ‘झाडांआधी आम्हाला कापा’, असा तो संदेश होता.

‘आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात नेहमी सोबत असशील’
किमान १० झाडं लावली तरच मिळणार बंदुकीचा परवाना, झाडांना असा सहन करावा लागतो तुमच्या-आमच्या शिक्षणाचा त्रास., या आंदोलनाने जगातील सर्वांत उंच पर्वतावर पर्यावरणाच्या संकटामुळे जो विनाश ओढावत होता, त्याकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं.

१९७० साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने स्थानिक गावकऱ्यांचे डोळे उघडले. या महापुरामुळेच “जंगलतोड, भूस्खलन आणि पूर यांच्यातला संबंध स्पष्ट झाल्याचं” इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी चिपको आंदोलनाचं वर्णन करताना म्हटलं होतं.

या महापुरानंतर तीन वर्षांनी बहुगुणा आणि सहकारी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारण्याचं आंदोलन सुरू केलं. निसर्ग संवर्धनासाठी तरुणांनी बोट कापून शपथा घेतल्या.
लवकरच हिमालयाच्या कुशीतल्या गावांमधल्या स्त्रियांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्या झाडांना मिठी मारायच्या, झाडांना राखी बांधायच्या. इतकंच नाही तर वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांची हत्यारंही पळवायच्या.

हिमालयाच्या कुशीतच जन्माला आलेले बहुगुणा यांनी सर्व धागे बरोबर जुळवले होते.

जंगलतोडीमुळे सुपीक जमिनीची धूप झाली आणि त्यामुळे गावातल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी शहराची वाट धरावी लागली, असं बहुगुणा सांगत.गावातली पुरुष मंडळी शहरात गेल्याने गावात मागे राहिलेल्या महिलांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली.

शेतीसोबतच गुरांसाठी चारा आणणे, जाळणासाठी लाकूड तोडून आणणे, नदी-विहिरींवरून पाणी भरून आणणे अशी सगळी कामं स्त्रिया करू लागल्या आणि म्हणूनच महिलांच्या अधिकारांसाठीच्या लढ्यात चिपको आंदोलनही एक मैलाचा दगड ठरला.

वर्षागणिक बहुगुणा यांच्या आंदोलनाला बळ मिळत गेलं. स्त्रिया आणि महाविद्यालयीन तरुण त्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. ते शांततामय मार्गाने निदर्शनं करत, वृक्षतोड करायला येणाऱ्यांसमोर झाडांना मिठ्या मारत, उपोषण करत.

अखेर या सर्वांचा परिणाम झाला. १९८१ साली केलेल्या उपोषणानंतर सरकारने उत्तराखंडमध्ये व्यावसायिक वापरासाठी झाडांची कत्तल करण्यावर १५ वर्षांसाठी बंदी आणली. दोन वर्षांनंतर हिमालयात होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चार हजार किमीची पदयात्रा केली.

काश्मीर आणि कोहिमाच्या या यात्रेनंतर त्यांनी १९९२ साली भारतातील सर्वांत उंच धरण असलेल्या टिहरी धरणाच्या बांधकामाविरोधातही आंदोलन केलं. या धरणाविरोधात त्यांनी मुंडन करत उपोषण केलं. या धरणात इतर शेकडो लोकांप्रमाणेच बहुगुणा यांचंही वडिलोपार्जित घरं गेलं होतं.
जंगलतोडीसाठी वन अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्यातल्या संगनमताविषयी ते कायम उघडपणे बोलायचे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बहुगुणा यांच्या आंदोलनाविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, “खरं सांगायचं तर मला त्यांच्या आंदोलनामागचा नेमका उद्देश काय आहे, ते माहिती नाही. पण, त्यांना जर खरंच वृक्षतोड थांबवायची असेल तर मी त्यांच्यासोबत आहे.”

साधी राहाणी आणि म. गांधींच्या तत्त्वांवर चालणारे बहुगुणा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. एका छोट्या आश्रमात ते राहत. हिंसेला त्यांचा तीव्र विरोध होता आणि राजकारणापासून त्यांनी स्वतःला कायम दूर ठेवलं होतं. परदेशातून व्यापार करण्याऐवजी आत्म-निर्भरतेवर त्यांचा अधिक विश्वास होता. ते भौतिकवादाचा विरोध करायचे.

मानवी विष्ठेपासून बायोगॅस निर्मिती, सौर आणि पवन ऊर्जा, जलविद्युत निर्मिती याद्वारे भारत ऊर्जेबाबत ‘अहिंसक आणि शाश्वत’ मार्गाने स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा विश्वास त्यांना होता. कमी ऊर्जेवर चालणारी यंत्र विकसित करावी, असा सल्लाही ते देत.

बीबीसीचे माजी सहकारी असलेले अमित बरुहा १९७० साली शाळेच्या सहलीच्या निमित्ताने बहुगुणा यांना भेटले होते आणि त्यांचं काम प्रत्यक्ष बघितलं होतं.

त्या सहलीच्या आठवणी सांगताना तिथे वादविवाद किंवा संघर्ष करणारा नाही तर एक मितभाषी, सौम्य आणि सहृदयी माणसाचं दर्शन झाल्याचं ते सांगतात. अमाप वृक्षतोडीमुळे हिमालयातले झरे कोरडे पडत चालल्याचं त्यांनीच सर्वप्रथम निदर्शनास आणून दिल्याचं बरुहा म्हणतात.

हिमालयातून वाहणारे झरे कोरडेठाक पडल्याचं आणि दूरवरून पाणी भरुन आणणारे स्थानिक आपल्याला दिसल्याचं बरुहा सांगतात. स्वतःच्याच अनुभवातूनच बहुगुणा यांना आंदोलनाची प्रेरणा मिळाल्याचं बरुहा सांगतात. पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारा ‘धरणीपुत्र’ म्हणून सुंदरलाल बहुगुणा कायम स्मरणात राहतील.

१९२७ : पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पर्यावरण प्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म. ( मृत्यु : २१ मे २०२१ )

‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांचा आज जन्मदिन. दि. ९ जानेवारी १९२२ रोजी पाकिस्तानात असणा-या ‘रायपूर’ गावी त्यांचा जन्म झाला. १९४५ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून ते एमएस्सी झाले. १९४८ मध्ये लिव्हरपूल (इंग्लंड) येथे संशोधन कार्य करून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. तेथेच अनेक विद्यापीठांतून जीवशास्त्र व रसायनशास्त्राचे अध्यापन केले.

१९६६ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले.

जीवनशास्त्रात केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिकतेतील रहस्यावर खूपच प्रकाश पडला आहे. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांची महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबतच १९६८चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. भारत सरकारने १९६३ मध्येच त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने गौरविले होते. डॉ. हरगोविंद खोराना यांना १९६९ च्या जून महिन्यात निर्जीव रसायनापासून जनुके बनविण्यात यश मिळाले.

जनुकातील महत्त्वाचा भाग म्हणजे डी.एन.ए. होय. त्यांच्या या संशोधन कार्याचा उपयोग शरीरातून आनुवंशिक रोगांचे उच्चाटन होऊ शकेल. त्यांच्या या शोधामुळे माणसाच्या जीवनाचे नंदनवन बनेल.

१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचा जन्म.
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

  • घटना :
    १७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.
    १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.
    १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
    १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
    २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
    २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
    २००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
    २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

• मृत्यू :

• १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून, १८४२)
• २००४: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.

  • जन्म :

२०२४ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी परंपरेतील भारतीय शास्त्रीय संगीतकार रशीद खान यांचे निधन ( जन्म : १ जुलै, १९६८ )
१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
• १९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म. ( मृत्यू : २४ मे, २००४)
• १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८)
१९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.
१९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »