प्लास्टिक द्या, साखर घ्या
भटिंडा- प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भटिंडातील बल्लोह गावातील ग्रामपंचायतीने “प्लास्टिक द्या, साखर घ्या” मोहीम सुरू केली आहे.
पंचायतीने गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा आणणाऱ्या रहिवाशांना मोफत साखर देण्याची घोषणा केली.
गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीचे प्रमुख गुरमीत सिंग मान म्हणाले, “आम्हाला आमचे गाव प्लास्टिकमुक्त करायचे आहे. जो कोणी प्लास्टिकचा कचरा घेऊन येईल, त्याला आम्ही त्या बदल्यात साखर देऊ.” ते म्हणाले, “गाव प्लास्टिकमुक्त करण्यासोबतच ओला व सुका कचरा व्यवस्थापन करणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे. आम्ही गावात निळ्या आणि हिरव्या डस्टबिनचे वाटप करू.
पंचायत गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा लुधियानास्थित कारखान्याला विकेल आणि त्यातून मिळणारा पैसा विकासकामांसाठी वापरला जाईल. पंच प्रीतम कौर म्हणाल्या, “जागभर पसरलेला प्लास्टिकचा कचरा पाहून डोळ्यात पाणी आले. त्यामुळे आम्ही आमचे गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला.” गावाची लोकसंख्या साडेचार हजार व ९०० घरे आहे. यापूर्वी, पंचायतीने जाहीर केले होते की जे गावातील भातपिक काड जाळण्यापासून दूर राहतील त्यांना प्रति एकर 500 रुपये अनुदान मिळेल.