बीडच्या ऊसतोड मजूर कुटुंबाचे कर्नाटकवरून अपहरण

बीड: ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेल्या बीडमधील एका मजुराच्या कुटुंबाचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे आकाश भिसे (रा. बीड), त्यांची पत्नी मेघा भिसे, दोन लहान मुली आणि बहीण शीतल ढोबळे असे या कुटुंबाचे नाव आहे.
हे कुटुंब कर्नाटक येथे ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते. तेथून काही संशयितांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले.. कुटुंबाला सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी या गावात एका ठिकाणी डांबून ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, या मजूर कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे






