ब्लू सफायर फूडमध्ये थेट मुलाखती

जालना : प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमता असलेला गुळ पावडर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहे. सदर पदासाठी कमीत कमी 5 ते 7 वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, अनुभव व इतर तपशीलदर्शक माहिती अर्जासह ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा. लि. कंडारी, अंबड, ता. घनसांगवी जि. जालना या पत्त्यावर शुक्रवार, १७ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० यावेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
इंजिनिअरिंग विभाग
१ मिल फिटर ए ग्रेड 2 आय.टी.आय. फिटर
2 मिल फिटर बी ग्रेड 2 आय.टी.आय. फिटर
3 बॉयलिंग हाउस फिटर बी ग्रेड १ आय.टी.आय. फिटर
4 इलेक्ट्रीशियन १ आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन