‘बिद्री’वर रंगणार कुस्तीचा थरार!; २० मार्चला स्पर्धेचे आयोजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बिद्री : कुस्ती कलेस प्रोत्साहन देण्यासाठी येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कुस्ती उदयोन्मुख मल्लांसाठी मॅटवरील वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही कुस्ती स्पर्धा गुरुवार, दि. २० व २१ मार्चअखेर होणार आहे, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली नाही.

२५ किलोपासून ७४ किलोपर्यंत, तसेच ७५ किलोवरील खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. वजन गटनिहाय प्रथम क्रमांकाच्या मल्लांना कारखान्यामार्फत मासिक मानधन देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी गुरुवार, दि. २० मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वजन देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहावे. स्पर्धेचे नियम व अटी कारखान्याच्या प्रधान कार्यालयात पाहावयास मिळतील. कारखाना कार्यक्षेत्रातील अधिकाधिक मल्लांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही अध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »