भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांना यंदा मागची सगळी कसर भरून काढण्याची संधी आहे. शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) वेळेवर मिळेल आणि थकित एफआरपीचा प्रश्नही मार्गी लागेल, असे एकंदर चित्र आहे.

‘त्या’ साखर कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे साखर आयुक्तांना आदेश
जगातील प्रमुख देशांमध्ये साखरेच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या साखरेच्या आंतरराष्ट्रीय किंमती (International Raw Sugar Price) प्रति पौंड १९ सेंट्सच्या आसपास गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय साखर कारखान्यांना (Indian sugar Mills) त्यांच्याकडील अतिरिक्त साखरेचा साठा कमी करण्याची नामी संधी आहे, असे ऑल इंडीया शुगर ट्रेड असोसिएशनने (All India Sugar Trade Association) (एआयएसटीए) म्हटले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात कारखान्यांना अडचणी येणार नाहीत, असे एआयएसटीएने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांमधून निर्यातीसाठी एकूण ६४.१० लाख टन साखर रवाना करण्यात आली. त्यापैकी प्रत्यक्षात ५८.१० लाख टन साखरेची निर्यात (Physical sugar Export) झाली आहे. निर्यातदार आणि साखर कारखान्यांनी जवळपास ४९.६० लाख टन साखरेची थेट निर्यात (Sugar Export) केली. तर ८.५० लाख टन साखर भारतीय रिफायनरींना (Indian Refineries) निर्यात आणि रिफायनिंगसाठी देण्यात आली, असे एआयएसटीएचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी निवेदनात म्हटले आहे.

भारतीय साखरेला निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७४ लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले आहेत. रेल्वे वॅगन उपलब्ध नसल्यामुळे साखरेच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. सध्या रेल्वेने गव्हाच्या वाहतुकीला प्राधान्य दिले आहे. साखर निर्यातदारांना रेल्वे वॅगन्सची व्यवस्था करणे कठीण जात असल्याचे एआयएसटीएच्या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, चालू हंगामात भारतातून ८५ लाख टन साखर निर्यात होण्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) व्यक्त केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »