मदनलाल धिंग्रा

आज रविवार, ऑगस्ट १७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २७, शके १९४७
सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १९:०५
चंद्रोदय : ०१:०९, ऑगस्ट १८ चंद्रास्त : १४:०४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – १९:२४ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०३:१७, ऑगस्ट १८ पर्यंत
योग : व्याघात – ०१:४०, ऑगस्ट १८ पर्यंत
करण : तैतिल – ०८:२८ पर्यंत
द्वितीय करण : गर – १९:२४ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १७:२९ ते १९:०५
गुलिक काल : १५:५४ ते १७:२९
यमगण्ड : १२:४२ ते १४:१८
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १७:२३ ते १८:१४
अमृत काल : ००:१६, ऑगस्ट १८ ते ०१:४७, ऑगस्ट १८
वर्ज्य : १९:४४ ते २१:१५
पंजाबमधील आद्य क्रांतिकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म १८ फेब्रुवारी, १८८३ साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला.
सन १९०६ मध्ये ते आगबोटीवर काम करुन स्वकष्टाने इंग्लंडला गेले. सन १९०८ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर, शामाजी कृष्णवर्मा इ. च्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील क्षात्रतेज व देशप्रेम जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट जुलमी व भारतद्वेषी अधिकार्याला संपविण्याचा निश्चय केला. लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणारे आहे. ही खात्रीलायक बातमी मदनलाल यांना समजली होती. समारंभात मदनलाल यांनी चार गोळया झाडल्या. कर्झन हे तत्काळ जागेवर ठार झाले. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले.
लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात दि. १७ ऑगस्ट १९०९ रोजी सकाळी ९ वाजता या क्रांतिवीराला फाशी देण्यात आली. मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत की, ‘परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युध्दमान राष्ट्र होय. नि:शस्त्रांना उघडपणे रणांगणात उतरुन सामना देणे अशक्य असल्यामूळे मी दबा धरुन हल्ला चढविला. बंदुका तोफा वापरायची मला परवानगी नाही म्हणून मी पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच होय.’
• १९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे भारतमातेसाठी बलिदान. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
विल्यम केरी – ख्रिस्ती धर्मोपदेशक, हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत.
विल्यम केरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ असून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते. – विल्यम केरी यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर्दॅम्प्टन परगण्यात टोस्टर(Towcester)जिल्ह्यात पॉलरस्परी(Paulerspury) या खेड्यात ऑगस्ट १७,इ.स. १७६१ रोजी झाला. त्यांचे वडील शाळामास्तर होते. गरीब परिस्थितीमुळे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एका चांभाराकडे उमेदवारी केली. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत चांभाराचा व्यवसाय केला. जोडे शिवीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून त्यांनी मिशनरी व्हावयाचे ठरवले. धंदा सोडून ते बॅप्टिस्ट पंथात दाखल झाले व जॉन थॉमस यांच्याबरोबर पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात ११ नोव्हेंबर १७९३ रोजी आले. जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमस यांच्याकडून त्यांनी बंगाली भाषेची तोंडओळख करून घेतली.
बंगालमध्ये आल्यावर केरी यांनी माल्दा येथे शेती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर मदनवती येथे त्यांनी निळीच्या मळ्यात पाच वर्षे नोकरी केली. या काळात राम बसु यांच्या मदतीने विल्यम केरी यांनी बंगालीचा सखोल अभ्यास केला. त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे अध्ययन केले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या अभ्यासाने ९ वर्षात त्यांनी वेद वाचण्याइतकी प्रगती केली. त्यानंतर ते १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर (Serampur) या डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली आणि एक छापखाना उभारला.
कलकत्त्याच्या फ़ोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत भाषा आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे १८०१ ते १८३० पर्यंत प्राध्यापक होते. ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या भाषांत पारंगत होते. पंचानन कर्मकार नावाच्या लोहाराकडून त्यांनी अनेक भाषांचे खिळे करून घेतले आणि छपाईला सुरुवात केली. छापखान्यातून १८३४ पर्यंत बंगाली, मराठी, नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू, पंजाबी , उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी इत्यादी इत्यादी चाळीस भाषांमधून त्यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या. पौर्वात्य भाषांच्या छपाईचा त्यांनी पायाच घातला.
विल्यम केरी यांनी इ.स. १८०५ ते १८२५ या काळात मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमान, बायबलचा नवा करार, जुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ लिहून मुद्रित केले. धार्मिक साहित्य निर्मितीव्यतिरिक्त केरी यांनी १८०५ साली मराठी भाषेचे व्याकरण देवनागरीत मुद्रित केले आहे. १८१० साली केरी यांनी ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा अर्थ इंग्रजीत दिला आहे. १८१४ साली ‘सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली ‘रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत केरी यांनी लिहून मुद्रित केले.[२] इ.स. १८०१मध्ये विल्यम केरी यांनी पंडित वैजनाथ यांच्या मदतीने श्रीरामपूर बंगाल येथे पहिला मोडी लिथोग्राफ बनवला.
१७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४- श्रीरामपूर (बंगाल)
- घटना :
१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.
१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
• मृत्यू :
२०२० पंडित जसराज – हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत. (जन्म : २८ जानेवारी ,१९३०,)
- जन्म :
१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.
१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)
१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट ,१९८३ )
१९३२: नोबेल पारितोषिक सन्मानित त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म. ( मृत्यू : ११ ऑगस्ट, २०१८ )
१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म. ( मृत्यू : १० मे, २०१५ )
संकलन : संजय सोहोनी