मधू दंडवते

आज बुधवार, नोव्हेंबर १२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २१, शके १९४७
सूर्योदय : ०६:४४ सूर्यास्त : १८:०१
चंद्रोदय : ००:५२, नोव्हेंबर १३ चंद्रास्त : १३:१३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – २२:५८ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – १८:३५ पर्यंत
योग : शुक्ल – ०८:०२ पर्यंत
करण : बालव – १०:५७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २२:५८ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : कर्क – १८:३५ पर्यंत
राहुकाल : १२:२३ ते १३:४७
गुलिक काल१०:५८ ते १२:२३
यमगण्ड : ०८:०९ ते ०९:३३
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०० ते १२:४५
अमृत काल : १६:५८ ते १८:३५
वर्ज्य : ०७:१५ ते ०८:५२
आज जागतिक न्यूमोनिया दिन आहे.
लोकनेते मधू दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या.
याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.
त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले.
हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.
• २००५: रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९२४)
पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली : हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरूमानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते.
१९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान त्यांच्या पत्नी तेहमिना यांनी सलीम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. परंतु सलीम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी मध्ये गाईड लेक्चरर ची नोकरी मिळाली, परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात पक्षिशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षिशास्त्राचे प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.
भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरीक्षकांसारखेच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीमजवळ आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर ‘बीएन्एच्एस’च्या जर्नलमध्ये त्यांनी प्रदीर्घ शोधनिबंध लिहिला. हा निंबध त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास जबाबदार ठरला. त्यांनी पक्ष्यांना केवळ टिपून त्यात भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षीशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षी शास्त्रालाच वेगळी दिशा दिली.
१९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे. डॉ. सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीदारीत त्यांनी अपार परिश्रम घेऊन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जातींच्या व २१०० उपजातींच्या नोंदी, त्यांच्या सवयी वगैरे सर्वांगीण शास्त्रशुद्ध माहिती चित्रांसहित एकाच ठिकाणी उपलब्ध केली.
भारत सरकारने पद्मभूषण, (१९५८) पद्मविभूषण, (१९७६) पुरस्कार देऊन सन्मानित केले ब्रिटिश पक्षितज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक, (१९६७), हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क, (१९८६) हे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
१८९६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. ( मृत्यू: २० जून, १९८७ )
- घटना :
१९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
१९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
१९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
१९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
१९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
१९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
२०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
२००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
• मृत्यू :
• १९४६: बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर, १८६१)
• १९५९: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट, १८८६)
• १९५९: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल, १८९६)
• १९९७: वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.
• २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर, १९४६)
- जन्म :
१८८०: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर, १९६७)
१९०४: समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल , १९८९)
१९४०: हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै, १९९२ – मुंबई)






