मुलीच्या लग्नासाठी शंभर किलो साखर भेट
जालना- जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी हे आमच्या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवत असतात. त्याला कारखान्याबद्दल एक आत्मियता असते. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून कारखान्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी दिली.
100 किलो देण्यात येणारी साखर ही शेतकऱ्यांच्या घरी पोहोच करण्यात येणार आहे. तर बाकीच्या ऊस उत्पादक सभासदांना 50 किलो साखर घरपोच देण्याचा निर्णय कारखान्यानं घेतला असल्याचे घाटगे यांनी सांगितले.