मोक्षदा एकादशी

आज सोमवार, डिसेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) १०, शके १९४७
सूर्योदय :०६:५५ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय : १४:४८ चंद्रास्त : ०३:४९, डिसेंबर ०२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : मोक्षदा एकादशी – १९:०१ पर्यंत
नक्षत्र : रेवती – २३:१८ पर्यंत
योग : व्यतीपात – ००:५९, डिसेंबर ०२ पर्यंत
करण : वणिज – ०८:२० पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – १९:०१ पर्यंत
क्षय करण : बव – ०५:३३, डिसेंबर ०२ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : मीन – २३:१८ पर्यंत
राहुकाल : ०८:१८ ते ०९:४२
गुलिक काल : १३:५१ ते १५:१४
यमगण्ड : ११:०५ ते १२:२८
अभिजित मुहूर्त : १२:०५ ते १२:५०
दुर्मुहूर्त : १२:५० ते १३:३४
दुर्मुहूर्त : १५:०२ ते १५:४७
अमृत काल : २१:०५ ते २२:३४
वर्ज्य : १२:१४ ते १३:४३
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. गीतेचा या दिवशी जन्म झाला म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जातो. या एकादशीला मोक्षदा एकादशी असे नाव आहे आणि भगवद्गीता ही मोक्षदा आहे, अशी अनेक साधुसंतांची साक्ष आहे.
भागवत धर्माचाच नव्हे तर हिंदू धर्मातील सगळ्या धार्मिक संप्रदायाचा मान्य असलेला हा ग्रंथ आहे. ख्रिश्चनाचे बायबल व मुसलमांनाचे कुराण त्यांच्याप्रमाणे गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून समजला जातो.
केवळ सातशे श्लोकांच्या एका महान ग्रंथाने वर्षानुवर्षे संपूर्ण जगावर घातलेली ही मोहिनी हे जगातील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. गीतेवरून स्फूर्ति घेऊन गीतेनंतरच्या पुढील काळात पिंगलगीता शपांकगीता, मंकिगीता, बोध्यगीता विचरव्युगीता, हारीगीता, वृत्रगीता पराशरगीता, हंसगीता, ब्राह्मणगीता, अवधूतगीता सूर्यगीता, ब्रह्मगीता, अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, उत्तरगीता, कपिलगीता, व्यासगीता, गणेशगीता, देवीगीता, पांडवगीता, भिक्षुगीता, शिवगीता, रामगीता, सूतगीता अशा असंख्य गीता एवढेच काय पण यमगीतादेखील लिहिली गेली.
भारताच्या बाहेरही शेकडो वर्ष या ग्रंथांचे भक्त झाले आहेत. अरबी मुसाफिर अल बीरूनी (९७३-१०४८) याला हा ग्रंथ फार पसंत पडला, लंङन येथे १७८५ साली विल्कीन्सन याने गीतेचे इंग्लिश भांषातर प्रसिद्ध केले. त्यामुळे युरोपमध्ये याची चांगली प्रसिद्धी होऊ लागली. ई. आर्नल्डने केलेले गीतेचे द सॉग सिलेस्टिअल हे भांषातररही प्रसिद्ध आहे.
१८२३ साली आउगुस्ट हिल्हेल्म फोन स्लेगेल (१७६७-१८४५) याने गीतेची परिशुद्ध आवृती लॅटिन भाषांतरासह १८२३ मध्ये प्रसिद्ध केली. हे भाषांतर जर्मन पंडित व्हिल्हेल्म फोन हंबोल्ट(१७६७-१८३५) याने वाचले आणि तो हर्षित झाला. तो म्हणाला महाभारतील भगवद्गीता ही घटना फार सुंदर आहे. आपणास माहीत असलेल्या साहित्यांच्या जगात बहुधा सर्वश्रेष्ठ अशी ही तत्त्वज्ञानात्मक कविता आहे, असे म्हणावे लागते. बर्लिन ॲकॅडेमीमध्ये त्याने या विषयावर विस्तृत असा शोधप्रबंध लिहिला व श्लेगेलच्या गीतांभाषातरावर विस्तृत समालोचना लिहिली. त्यानंतर आतापर्यत युरोपियन भाषामध्ये गितेचे पुनःपुन्हा भांषातरे होत राहिली.
सर्व भाष्यकारांच्या मते संपूर्ण गीताशास्त्राचा निःश्रेयस पर्यवसायी सारभूत अर्थ सांगणारा आदेश असा.
“मत्कर्मकृन्मत्परमो मदभक्तः संगवर्जितः ll
सर्वभूतेषु यःस मामेति पांडव ll (गीता ११.५५)
अर्थ : ” माझ्याकरता कर्मे करणारा, मीच ज्याचे अंतिम उदिष्ट आहे, माझा भक्त, आसत्किरहित, प्राणिमात्राबद्ल निर्वेर वृत्तीचा असा जो तो, हे पांडवा, माझ्यापाशी येतो”.
यावरूनही मानवी मनावर, जीवनावर, विचारांवर गीतेचा किती प्रभाव पडलेला आहे ते कळते. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीताजयंती म्हणून सन्मानिताना तिला ‘ मोक्षदा ‘ म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारी. म्हणून गौरविणे किती यथार्थ आणि उचित आहे.
आज ‘ मोक्षदा ‘ एकादशी / गीताजयंती आहे .
संत माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदे – या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे.
या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’
आज माणिक प्रभू जन्म समाधी दिन आहे आहे. ( समाधी: मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १७८७ ) ( २९ जन्म तिथि : २२/१२/१८१७ – श्रीदत्त जयंती )
आज जागतिक एड्स दिन आहे .
प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.
धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले.
१९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना तेा भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली.
दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.
• १९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून१८९९)
||गणपत वाणी बिडी पिताना|
| चावायाचा नुसतीच काडी; |
|म्हणायचा अन मनाशीच की|
|या जागेवर बांधिन माडी; ||
|मिचकावुनि मग उजवा डोळा|
| आणि उडवुनी डावी भिवयी,|
| भिरकावुनि ती तशीच ध्यायचा |
| लकेर बेचव जैसा गवयी. ||
|| गि~हाईकाची कदर राखणे; |
| जिरे, धणे अन धान्यें गळित, |
| खोबरेल अन तेल तिळीचे |
| विकून बसणे हिशेब कोळित; ||
|| स्वप्नांवरती धूर सांडणे |
| क्वचित बिडीचा वा पणतीचा |
| मिणमिण जळत्या; आणि लेटणे |
| वाचित गाथा श्रीतुकयाचा. ||
१९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च१९५६)
- घटना :
१८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
१९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
१९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
१९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.
१९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
१९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.
१९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
१९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.
१९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
• मृत्यू :
• १९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन. (जन्म : २ ऑक्टोबर, १९०८)
• १९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट, १९००)
• १९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै, १९१४)
- जन्म :
१८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. ( मृत्यू: २१ ऑगस्ट, १९८१ )
१९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर, १९६६)
१९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.
१९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.
१९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ शिरिन एम. राय यांचा जन्म.




