मोरोपंत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, एप्रिल १५, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २५, शके १९४६
सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १८:५६
चंद्रोदय : २१:०० चंद्रास्त : ०७:३१
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – १०:५५ पर्यंत
नक्षत्र विशाखा – ०३:१०, एप्रिल १६ पर्यंत
योग : सिद्धि – २३:३३ पर्यंत
करण : गर – १०:५५ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ००:०७, एप्रिल १६ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : तूळ – २०:२७ पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:२२
गुलिक काल : १२:३९ ते १४:१३
यमगण्ड : ०९:३० ते ११:०४
अभिजित मुहूर्त : १२:१३ ते १३:०४
दुर्मुहूर्त : ०८:५२ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : २३:३० ते ००:१५, एप्रिल १६
अमृत काल : १७:१७ ते १९:०५
वर्ज्य : ०६:३१ ते ०८:१९

रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||
निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||

या गझलेतल्या पहिल्या श्ब्दावरून या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. ‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.

वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली..

पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कर्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.

• १७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन. . (जन्म : पन्हाळगड, इ.स. १७२९)

शीख पंथीयांचे पाचवे गुरु – गुरू अर्जुन : हे शीख संप्रदायातील दहा गुरूंच्या पैकी एक गुरू आहेत. ते शिखांचे पाचवे गुरू मानले जात असून हौतात्म्य स्वीकारलेले गुरू म्हणून त्यांच्याप्रती विशेष आदर दिसून येतो. शीख संप्रदायाचा मूळ ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथ साहिब याचे संकलन यांनी केलेले आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी गुरुपदी आलेल्या गुरू अर्जुन यांनी; आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा प्रत्येक शीख व्यक्तीने सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी दान केला पाहिजे अशी शिकवण शीख धर्मात रुजविलेली आहे. यांचे पुत्र गुरू हरगोविंद हे शिखांचे सहावे गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.
आपल्या धर्मासाठी गुरू अर्जुन यांनी बलिदान दिले आहे. सम्राट अकबर यांच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या जहांगीर यांच्या मुलाने बंडखोरी केल्याने त्याला अटक करण्याचे आदेश निघाले. त्यावेळी तो पळून आला आणि प्रवासात गुरू अर्जन यांना भेटला. गुरूंनी त्याचे स्वागत केले मात्र नंतर त्याने गुरू अर्जुन यांच्यावर आरोप करून त्यांना अटक केली.

आपल्या मनाप्रमाणे गुरूंनी वागावे यासाठी त्याने त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न मिळाल्याने त्याने गुरूंचा छल करून त्यांना हौतात्म्य स्वीकारायला लावले. गुरूंचे अर्धवट बेशुद्ध अवस्थेतील शरीर रावी नदीत सोडून देण्यात आले. तिथे किनारी त्यांच्या स्मरणार्थ डेरा साहिब गुरुद्वारा याची निर्मिती करण्यात आली आहे.

१५६३ : शीख पंथीयांचे पाचवे गुरु – गुरु अर्जुनदेव यांचा जन्मदिन ( बलिदान दिवस : ३० मे, १६०६)

  • घटना :

१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९९७: मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

• मृत्यू :

• १९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर, १९०७)
• २०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

  • जन्म :
    १८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर, १९७९)
    १९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.
    १९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी, १९९७)
    १९२२: गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर, १९९९)
    १९३२: कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)
    १९५२ : ‘बीज अंकुरे अंकुरे….. ओल्या मातीच्या कुशीत’ या गीताने ‘दूरदर्शन’ वर गाजलेल्या ‘गोट्या’ मालिकेला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या गीताचे गीतकार एकापेक्षा एक अजरामर गीतांनी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान देणारे संगीतकार तसेच उत्कृष्ट चित्रकार मधुकर आरकडे यांचा जन्म ( मृत्यू : १५ मार्च २०१५ )
    १९६३: भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »