रथसप्तमी
![Daily Panchiang](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2022/06/panchang1-e1722857444442.webp?fit=768%2C436&ssl=1)
आज मंगळवार, फेब्रुवारी ४, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १५ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:३३
चंद्रोदय : ११:१२ चंद्रास्त : ००:२५, फेब्रुवारी ०५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – ०२:३०, फेब्रुवारी ०५ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – २१:४९ पर्यंत
योग : शुभ – ००:०६, फेब्रुवारी ०५ पर्यंत
करण : गर – १५:३२ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०२:३०, फेब्रुवारी ०५ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १५:४३ ते १७:०८
गुलिक काल : १२:५३ ते १४:१८
यमगण्ड : १०:०२ ते ११:२७
अभिजितमुहूर्त : १२:३० ते १३:१५
दुर्मुहूर्त : ०९:२८ ते १०:१३
दुर्मुहूर्त : २३:३७ ते ००:२७, फेब्रुवारी ०५
अमृत काल : १५:०३ ते १६:३४
वर्ज्य : १८:०४ ते १९:३४
वर्ज्य : ०६:५५, फेब्रुवारी ०५ ते ०८:२६, फेब्रुवारी ०५
।। एषः ब्रह्मा च विष्णुश्च रुद्रैषाहि च भास्करः।
त्रिदेवात्मा त्रिमूर्त्यात्मा सर्वदेवमयो रविः।।
आज ‘रथसप्तमी’ आहे ! त्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर घरी सामुहिक स्वरूपात सूर्यनमस्कार घालून वर्षभर चालणारा हा . सूर्यनमस्कार_यज्ञ आरंभ करा आणि अखंडितपणे चालू ठेवा !
नियमित करण्याची सूर्योपासना…… सूर्यनमस्कार !
सूर्यनमस्कार घालायच्या आधी म्हणायचा मंत्र –
ॐ ध्येय: सदा सवित्रुमंडल मध्यवर्ती ।
नारायण सरसिजासरसन्निनीष्ट: ।
केयुरवान् मकरकुंडलवान् किरिटी ।
हारिहिरण्मय वपुर्धृतशंखचक्र: ॥
आज रथसप्तमी आहे.
नर्मदा नदीचा प्रकट दिवस हा तिची जयंती म्हणून साजरा केला जातो.
अमरकंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थानी आणि मध्य प्रदेशातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते.
होशंगाबाद येथील घाटांवर दिवसभर हा उत्सव साजरा होतो. नदीच्या घाटांवर अनेक भाविक दिवे लावतात आणि नदीच्या पात्रात सोडतात. यानिमित्ताने नर्मदेचे मंदिर सजविले जाते. साधू आणि संत या दिवशी नर्मदेच्या विविध घाटांवर यज्ञयाग करतात आणि सेवा करतात, पूजा करतात.
नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासूनन उत्पन्न झाली आहे आणि घडलेली पापे धुऊन काढण्यासाठी या नदीचे महत्त्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते. नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातून घडलेली सर्व पापे धुऊन जातात. या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात.
आज नर्मदा जयंती आहे.
नाथपंथिय हठयोगी व जलतपस्वि महायोगी गगनगिरी महाराजांची ( श्रीपाद गणपतराव पाटणकर ( साळुंखे ) यांचे वैशिष्ट्ये म्हणजे सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते.
प.पू. महाराजांनी योगसामर्थ्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवला. प.पू. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. १९३२ ते १९४० सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाचा डंक या भागात राहून अरण्यनिवासी तप केले. १९६५ पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ कु़न्डे व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत.
२००८ : आज स्वामी गगनगिरी महाराज ( श्रीपाद गणपतराव पाटणकर ( साळुंखे ) यांचा समाधी दिन आहे. ( पौष कृ १२ )
आज जागतिक कर्करोग दिवस आहे.
“गड आला पण सिंह गेला” –
आज ४, फेब्रुवारी… १६७० रोजी आजच्याच दिवशी कोंढाणा अर्थात सिंहगडावर पराक्रमाचा, त्यागाचा आणि निष्ठेचा असा अतुलनीय इतिहास लिहिला गेला. वर्ष १६६५. जून महिना. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत केलेल्या तहात कोंढाणा किल्ला द्यावा लागला. मात्र १६७० साली कोंढाणा पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावेळी कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी एक नाव पुढं आलं. ते नाव होतं, तानाजी मालुसरे…
१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर वीरमरण.
पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखले जाणारे ब्रिजमोहन मिश्रा, ( हे कथक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक होते.
ते कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज आणि त्यांचे वडील आणि गुरू, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायकसुद्धा होते.
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कथ्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी ‘कलाश्रम’ ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली .
‘ब्रिजमोहन मिश्रा’ उर्फ बिरजू महाराजांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पंडित बिरजू महाराजांचे वडील म्हणजे लखनऊच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील ‘अच्छन महाराज’. बिरजू हे त्यांचे बालपणीचे नाव.
वयाच्या चौथ्या वर्षी आपले काका शंभू महाराज, लच्छू महाराज आणि वडील अच्छन महाराज यांच्याकडून बिरजू यांना कथ्थकचे धडे मिळू लागले. त्यांच्या अलाहाबादच्या घरात एक नृत्यखाना होता, जिथे दिवसभर नर्तन चालत असे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण सुरू होण्यापूर्वीच घरातील या नृत्यखान्यातील घुंगरांचा नाद बिरजूंच्या नसानसात भिनलेला होता. कथ्थक करण्यापूर्वीच बाल बिरजूची बोटे तबल्याच्या ठेक्यावर तालबद्ध नर्तन करू लागली होती.
लहान वयात त्यांना तबला वादन, गायन अशा सर्वच कलांचे निसर्गदत्त वरदान लाभलेले होते. त्यातून आता एक कथ्थक नर्तक साकारू लागला. वयाच्या अगदी सातव्या वर्षी बिरजूने आपला पहिला नृत्याविष्कार सादर केला आणि तेराव्या वर्षात पदार्पण करतानाच बिरजू नृत्यगुरू बनले ते शेवटच्या श्वासापर्यंत.
त्यानंतर बिरजू महाराजांचा लौकिक वाढू लागला. संगीत भारती, भारतीय कला केंद्र, कथ्थक कला केंद्र अशा संस्थामधून कथ्थकचे गुरू म्हणून कलादान करत ते स्वतः स्थापन केलेल्या ‘कलाश्रम’ या संस्थेचे महागुरू झाले.
बिरजू महाराजांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली. त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावे म्हणजे- ‘फाग-लीला’, ‘मालती-माधव’, ‘कुमार संभव’, इ. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन देखील केलं आहे. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं.
बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि ‘कालिदास सन्मान’ही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना ‘मानद डॉक्टरेट’ बहाल केली होती.
२०१६ साली त्यांना उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठीचे ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ ’देखील मिळाले होते. परंतु लखनौ घराण्याच्या नृत्यशैलीला कुठल्याही फ्युजनशिवाय नित्यनूतन ठेवत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, ही महाराजांची खरी कमाई आहे.
बिरजू महाराजांची विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी इतर नृत्यप्रकारांचा सन्मानही केला. महाराज तबला, पखवाज, हार्मोनिअम अशी कितीतरी वाद्ये उत्कृष्टपणे वाजवत. गायन हे महाराजांचे एक विशेष अंग. त्यांनी गायनाचेदेखील काही कार्यक्रम सादर केले आहेत.
• १९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित पं. बिरजू महाराज यांचा जन्म. ( मृत्यू: १७ जानेवारी, २०२२ )
- घटना :
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
१९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली. - मृत्यू :
• २००१: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: ३१ मे , १९२८)
• २००२: || भोली सूरत दिल के खोटे |
|| नाम बड़े और दरशन छोटे || ह्या गाण्यावर ठेका धरायला लावणारे चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट , १९१३)
जन्म :
१८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)
१९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)