राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे.

कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज पाटील गटाचे पारडेही जड झाले आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात जवळपास 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्र्यांनी अपात्र ठरवले होते.

हे सर्व सभासद बोगस व कारखाना कार्यक्षेत्राबाहेरचे होते असा या सभासदांवर आरोप होता. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातही अपात्रतेचा हा निर्णय कायम ठेवण्यात आला.

अपात्र सभासदांनी त्या वेळचे सहकार व पणन मंत्री यांच्याकडे तातडीने अपील केले. त्यावरही सुनावणी झाली तरीही हे सर्व सभासद अपात्रच ठरले. प्रादेशिक सहसंचालकांचा 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेला निर्णय कायम ठेवत अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावण्यात आले होते. त्यानंतर या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांचेसमोर झालेल्या सुनावणीत 1346 अपात्र सभासदांचे अपिल फेटाळून लावण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »