विजयलक्ष्मी पंडित

आज सोमवार, ऑगस्ट १८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २८, शके १९४७
सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १९:०४
चंद्रोदय : ०२:०९, ऑगस्ट १९ चंद्रास्त : १५:०९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – १७:२२ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – ०२:०६, ऑगस्ट १९ पर्यंत
योग : हर्षण – २३:०० पर्यंत
करण : वणिज – ०६:२२ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – १७:२२ पर्यंत
क्षय करण : बव – ०४:२५, ऑगस्ट १९ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृषभ – १४:४० पर्यंत
राहुकाल : ०७:५६ ते ०९:३१
गुलिक काल : १४:१८ ते १५:५३
यमगण्ड : ११:०७ ते १२:४२
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १३:०८ ते १३:५९
दुर्मुहूर्त : १५:४० ते १६:३१
अमृत काल : १७:४४ ते १९:१५
वर्ज्य : ०८:३६ ते १०:०८
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हाचि आमुचा तारक मंत्र ।
न लगे आणिक यंत्र अन् मंत्र, सर्वही दोषा जाळी यथार्थ ।।
श्रीकृष्णसरस्वती (कुंभारस्वामी) – हे दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात.
श्री कृष्ण सरस्वती (कुंभारस्वामी )पुण्यतिथी आहे. ( जन्म: माघ वद्य पंचमी, शा.श. १७५८ / फेब्रुवारी ७, इ.स. १८३६; नांदणी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र देह विसर्जन- श्रावण वद्य दशमी, शा.श. १८२२ / २० ऑगस्ट, इ.स. १९००)
आज आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन आहे.
संगीतज्ञ, गायक – विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभुत्व व त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी ‘पलुसकर-पद्धती’ म्हणून ओळखली जाते..”गंधर्व महाविद्यालयाची” १९०१ साली “लाहोर” येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय. हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुस्कर हे निःसीम राम भक्त होते.”गंधर्व महाविद्यालयाची” स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी “श्री रामनाम आधारश्रम” म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तित्वात आहे. विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना बालपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीताला “संगीत प्रेस” च्या नावाने डोळे दिले.
जाहीर सभा संपल्यानंतर वंदे मातरम् म्हणावयाची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकरांनी सुरू केली, ती आजतागायत चालू आहे.
१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा विजया लक्ष्मी पंडीत. – त्यांचा जन्म सधन नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वरूपकुमारी. वडील मोतीलालजी यांचा पाश्चात्य विचारांकडील कल व आई स्वरूपराणी यांची भारतीय संस्कृतीवरील निष्ठा यांच्या संमिश्र वातावरणात त्यांचे बालपण गेले.
इंग्रजी अध्यापकांद्वारे घरीच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. काही काळ पुढील शिक्षणासाठी त्या स्वित्झर्लंडमध्ये होत्या. मोतीलाल व बंधू जवहरलाल हे रा ज का र णा त असल्यामुळे घरीच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. १९२१ मध्ये त्यांचा विवाह रणजित सीताराम पंडीत या मूळच्या महाराष्ट्रीय बॅरिस्टर यांचे बरोबर झाला . रणजित पंडीत हे एक विद्वान व प्रसिद्ध वकील होते आणि नेहरू कुटुंबाशी संबंध आल्यानंतर ते राष्ट्रीय लढ्यात ओढले गेले . त्यांनी लग्ना नंतर प्रथम कलकत्त्यास व पुढे अलाहाबाद येथे वकिली केली. त्यांनी मुद्राराक्षस, ऋतुसंहार व राजतरंगिणी या सस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले. त्यांना चंद्रलेखा, नयनतारा आणि ऋतुविलासा या तीन मुली झाल्या. त्यांपैकी नयनतारा सहगल लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.
विजयलक्ष्मींच्या राजकीय जीवनास असहकाराच्या चळवळीपासून सुरुवात झाली. या चळवळीत त्या सहभागी झाल्या व त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला.
१९३४ मध्ये त्या अलाहाबाद नगरपालिकेत निवडून आल्या. त्यानंतर त्यांची १९३६ साली त्यावेळच्या संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली, आणि लवकरच १९३७ मध्ये त्या स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांच्या पहिल्या महिलामंत्री झाल्या परंतु १९३९ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. यानंतर १९४२ सालच्या ‘छोडो भारत’ या आंदोलनास प्रारंभ झाला व त्यात त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. प्रकृतीच्या कारणाने त्यांची नऊ महिन्यानंतर सुटका करण्यात आली.
या परिस्थितीतही १९४३ मध्ये त्यांनी बंगाल दुष्काळ निवारण्याच्या कार्यात भाग घेतला. १९४४ साली रणजित पंडितांचे दम्याच्या विकाराने निधन झाले. हा आघात फार मोठा होता परिणामतः पुढील दोन वर्षे त्यांनी अमेरिकेत व्याख्यान दौरा काढला (१९४४–४६). भारतात परत आल्यानंतर पुन्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांचे मंत्रिपद अंगीकारले. तत्पूर्वी १९४०–४२ मध्ये त्यांना अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होण्याचा मान मिळाला होता.
१९४६ मध्ये त्यांची संविधान समितीच्या सदस्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी मंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली. स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांनी १९४७, १९४८, १९५२, १९५३ व १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्रांत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९५३ मध्ये त्यांची आमसभेची अध्यक्षा म्हणून निवड झाली. रशिया (१९४९), अमेरिका (१९५१), ग्रेट ब्रिटन (१९५४–६२) इ. विविध देशांत भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या (१९६२–६३).
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर फूलपूर मतदार संघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या (१९६४). १९६७ च्या निवडणुकीतही त्या लोकसभेवर निवडून आल्या, मात्र त्यांनतर खासदारकीचा राजीनामा देऊन समाजकार्यास त्यांनी वाहून घेतले (१९६८). १९७७ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेऊन आणीबाणीवर कडक टीका केली तथापि कोणतेही राजकीय पद स्वीकारले नाही.
अनेक भारतीय आणि विदेशी विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
त्या संसदपटू व वक्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्फुटलेखन तसेच ग्रंथलेखन केले आहे. त्यांचा ‘फॅमिली बाँड’ हा ए स्टडी ऑफ नेहरू या पुस्तकातील लेख उल्लेखनीय आहे. सो आय बिकेम ए मिनिस्टर (१९३९), प्रिझन डेज (१९४६), द रोल ऑफ विमेन इन मॉडर्न वर्ल्ड (१९५७) व द इव्होल्यूशन ऑफ इंडिया (१९५८) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)
- घटना :
१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
१९५८: बांगलादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
• मृत्यू :
• १९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)
• १९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)
• १९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)
• २००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
• २०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.
- जन्म :
१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)
१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)
१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)
१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.
१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.
१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.