विष्णू नरसिंह जोग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, फेब्रुवारी ५, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – *सौर माघ १६ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:११ सूर्यास्त : १८:३४
चंद्रोदय : ११:५५ चंद्रास्त : ०१:२८, फेब्रुवारी ०६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ००:३५, फेब्रुवारी ०६ पर्यंत
नक्षत्र : भरणी – २०:३३ पर्यंत
योग : शुक्ल – २१:१९ पर्यंत
करण : विष्टि – १३:३१ पर्यंत
द्वितीय करण : बव – ००:३५, फेब्रुवारी ०६ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मेष – ०२:१६, फेब्रुवारी ०६ पर्यंत
राहुकाल : १२:५३ ते १४:१८
गुलिक काल : ११:२७ ते १२:५३
यमगण्ड : ०८:३७ ते १०:०२
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:३० ते १३:१५
अमृत काल : १६:०० ते १७:३१

सर्व रोगाचे माहेरघर मुख असल्यामुळे ते बोलण्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी सांभाळले पाहिजे मुखाव्दारे तंबाखू, गुटखा आदी घातक पदार्थ चावले जाऊ नये व त्याचे प्राशन करू नये त्यामुळे मृत्यूकडे नेणाऱ्या रोगापासून बचाव होतो.

आज जागतिक मौखिक आरोग्य दिन आहे.

विष्णू नरसिंह जोग हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत.

त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.

विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, १९१६ साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.

• १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

नीला सत्यनारायण – सरकारी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना एक वेगळे पण जतन करून जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या नीला सत्यनारायण – या १९७२च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
त्यांचे वडिल वासुदेव आबाजी मांडके पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून तून दिली. त्या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला.

१९७२ साली त्या आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले.

धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले . नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.
आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर), मी क्रांतिज्योती (अनुभवकथन), रात्र वणव्याची (कादंबरी), व अन्य पुस्तके ही लेखन संपदा , तर आकाश पेलताना (कविता), आषाढ मेघ (कविता) इ. कविता लेखन होते.
अमेरिकेतल्या मेरीलॅंड येथील ‘इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री’चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स ॲवॉर्ड (इ. स. २०१५), महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २००७, संकल्प प्रतिष्ठान (कल्याण) जीवन गौरव पुरस्कार २००९, हिंदी साहित्य जीवन गौरव अशा मनाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले होते.

● १९४९ : सरकारी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना एक वेगळे पण जतन करून जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या नीला सत्यनारायण यांचा जन्म. ( मृत्यू : १६ जुलै, २०२० )

  • घटना :
    १२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
    १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
    १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
    १९४८: गांधी गांधी वधात नाव गोवून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक केली
    १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
    १९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
    १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
    २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
    २००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
  • मृत्यू :
    • १९२७: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै, १८८२)
    • २०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.
    • २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.
    • २००८: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी, १९१८)
    • २०१०: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी , १९३४)

जन्म :
१९०५: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट , १९९२)
१९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
• १९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म. ( मृत्यू :
३१ ऑक्टोबर २०१९ )
१९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »