शेखर गायकवाड, साखर आयुक्त

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. सध्या ते राज्याचे साखर आयुक्त आहेत. FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. साखर करखानदारीला ते चांगली शिस्त लावू शकले आहेत.
प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांनी आजवर 26 पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख पुस्तके शेतकऱ्यांच्या खूपच उपयोगाची आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
श्री. गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्यासाठी विपुल लिखाण केले आहे. त्यांची “जमीन व्यवहार नीती” सारखी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. माहितीपर पुस्तकांखेरीज त्यांनी साहित्यिक लिखाणदेखील केले आहे.