श्रीविठ्ठल कारखान्यावर ‘बायो सीएनजी’ची उभारणी; ग्राहकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार

पंढरपूर ः वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी केली आहे. नुकतेच त्याचे पुजनही करण्यात आल्याने लवकरच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस् प्रा.लि. हैद्राबाद या कंपनीमार्फत बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सदर कंपनीचे व्यवस्थापक हिमादिप, मनिषा नल्लावडला व कारखाना संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत १० मार्च रोजी सकाळी होम हवन आणि पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक संभाजी भोसले, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, कालीदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अशोक घाडगे, सचिन पाटील, धनाजी खरात, विठ्ठल रणदिवे, अॅड. नितीन खटके, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.बी. पाटील तसेच कंपनीचे पटनम महेंद्र रेड्डी, श्रीराम यरलागड्डा, हरिश्चंद्र यरलागड्डा, रमना रेड्डी, हरिष केथीरेड्डी, श्रीनिवास कासुला, नितीन देशपांडे, एस.जे. मलीक व कारखान्याचे चिफ केमिस्ट माने, डिस्टलरी मॅनेजर सोळंकी, एस.एस.ओ. महेश पाटील, नागटिळक, कोळेकर आदी पादाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.