श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शिरोळ – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या सन 2023 -2024 च्या गळीत हंगामाचा 52 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

‘ऊर्जांकुर’कडील बॉयलरचा संचालक रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुशीला पाटील आणि ‘डिस्टिलरी’कडील बॉयलरचा अग्निप्रदीपन सोहळा कारखान्याचे संचालक इंद्रजित पासगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजश्री पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालिका विनया घोरपडे, संचालक अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ऍड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, संचालिका सौ यशोदा कोळी, संगीता पाटील कोथळीकर, संचालक रणजीत कदम, महेंद्र बागे,विजय सूर्यवंशी, मलकारी तेरदाळे,बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, दरगु माने गावडे,प्रदीप बनगे, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »