‘श्री शंकर’च्या चेअरमनपदी आ. रणजितसिंह मोहिते
सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकारमहर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असलेला श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरची नूतन संचालक मंडळ निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व राखत पुन्हा विजय मिळविला.
निवडणुकीनंतर कारखाना कार्यस्थळी बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी टिळेकर यांनी जाहीर केली.
यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, दत्तात्रय रणनवरे, बाळासाहेब माने, कुमार पाटील, सुधाकर पोळ आदी उपस्थित होते.
आमदार रणजितसिंह मोहिते यांना पत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी