संपूर्ण गाळपाशिवाय कारखाने बंद करू नका : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रिकव्हरी नुकसानभरपाई, वाहतूक अनुदान देणार

बीड: सर्व ऊसगाळप (Sugarcane) झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका. रिकव्हरीचे नुकसान भरून काढण्यासह वाहतूक अनुदान देण्यात येईल, कारखान्यांचे (Factory) नुकसान होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक अडचणी आहेत, उसाला तुरे फुटलेत. मात्र शेतकऱ्यांच्या (Farmer) हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे श्री. पवार म्हणाले.
केज तालुक्यातील येडेश्‍वरी साखर कारखान्यातील (Yedeshwari Sugar Factory) आसवानी प्रकल्पाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. आठ) श्री. पवार (Deputy Cm Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष साह्यमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडित, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, महादेव महाराज बोराडे, पृथ्वीराज साठे, विजयसिंह पंडित, राजेश्‍वर चव्हाण, कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

ऊसगाळप, वीजपुरवठाप्रश्‍नी ‘किसान मोर्चा’चे ‘रास्ता रोको’
अजित पवार म्हणाले (Ajit Pawar), की कोल्हापूर भागात एक टन उसातून १२५ ते १३५ किलोपर्यंत साखर निघते. तर इकडे ११५ किलोच्या आत असते. त्यामुळे आम्ही ३१०० – ३२०० रुपये प्रतिटन भाव देतो. मात्र तेवढा भाव इकडे शक्य नाही. या भागात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न (Sugar Cane Question) निकाली काढण्यासाठी आता बंद झालेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर पाठविण्याबाबत साखर आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबतचा निर्णय गुरुवारीच (ता. सात) झाल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्यांनी (Factory) इथेनॉल निर्मितीकडे (ethanol production) भर द्यावा. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. वरचे पैसे फेडणाऱ्यांना माफी देण्याचा विचार आहे. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान (Farmer Grant 50 Thousand) देण्याचा निर्णय झाला आहे. या वेळी धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, प्रकाश महाराज बोधले यांचीही भाषणे झाली. बाळकृष्ण भवर यांनी प्रस्ताविक केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »