सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात; राज्यातील १९ हजार कारखाने लाल श्रेणीत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे  : राज्यातील १२ विभागांत एकूण १९ हजार ३४९ कारखाने धोकादायक लाल श्रेणीत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे,  तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाचा समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यकक्षेत सध्या एकूण १  लाख ३४ हजार ४६७ कारखाने आहेत. त्यापैकी धोकादायक लाल श्रेणीतील म्हणजेच प्रदूषण निर्देशांक ६० किंवा त्यापेक्षा जास्त असलेले १९ हजार ३४९ इतके आहेत. नारंगी श्रेणीतील म्हणजे प्रदूषण निर्देशांक ४१ ते ५९ असलेले ४० हजार ०१९ कारखाने, तर हिरव्या श्रेणीतील म्हणजे प्रदूषण निर्देशांक २१ ते ४० दरम्यान असणारे एकूण ५२ हजार ६०७ कारखाने आहेत. उर्वरित २२ हजार ४२० कारखाने धवल श्रेणीतील म्हणजेच प्रदूषण निर्देशांक २० किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे विभागात  ४ हजार ८४१ कारखाने लाल श्रेणीत

पुणे विभागात एकूण २९ हजार १४६ कारखाने आहेत. त्यापैकी धोकादायक लाल श्रेणीतील एकूण कारखाने ४ हजार ८४१ इतके आहेत. त्यात मोठे कारखाने १ हजार ७९०, मध्यम १९८, तर लहान २ हजार ८५३ कारखान्यांचा समावेश आहे. नारंगी श्रेणीतील मोठे कारखाने १ हजार ७८९, मध्यम ५६२, तर लहान कारखाने ६ हजार ९१४ आहेत. हिरव्या श्रेणीतील मोठे ६९९, मध्यम ४९८, तर लहान काराखाने ९ हजार ६२१ इतके आहेत. उर्वरित ४ हजार २२२ कारखाने धवल श्रेणीत येतात.

नाशिक विभागातील २ हजार १६४ कारखाने लाल श्रेणीत

नाशिक विभागात एकूण १८ हजार २१९ कारखाने आहेत. त्यापैकी धोकादायक लाल श्रेणीतील कारखाने २ हजार १६४ आहेत. मोठे कारखाने ५७५, मध्यम ९६, तर लहान कारखान्यांची संख्या १ हजार ४९३ इतकी आहे. नारंगी श्रेणीतील मोठे कारखाने २४९, मध्यम १९०, तर लहान कारखाने ४ हजार ११५ आहेत. हिरव्या श्रेणीतील मोठे १५१, मध्यम ११३, तर लहान कारखाने ६ हजार ०४३ आहेत. उर्वरित ५ हजार १९४ कारखाने धवल श्रेणीत येतात.

कोल्हापूर विभागातील १ हजार ८४२ कारखाने लाल श्रेणीत

कोल्हापूर विभागात एकूण २३ हजार २१८ कारखाने आहेत. त्यापैकी धोकादायक लाल श्रेणीतील एकूण कारखाने १ हजार ८४२ इतके असून त्यात मोठे कारखाने ३२७, मध्यम ८२, तर लहान १ हजार ४३३ कारखान्यांचा समावेश आहे. नारंगी श्रेणीतील मोठे कारखाने ११५, मध्यम १४२, तर लहान कारखाने ५ हजार ८३० आहेत. हिरव्या श्रेणीतील मोठे ४६, मध्यम ३८, ता लहान काराखाने ८ हजार ४५२ इतके आहेत. उर्वरित ६ हजार ७५३ कारखाने धवल श्रेणीत येतात.

रायगडमध्ये केवळ ९३९ कारखाने लाल श्रेणीत रायगड विभागात एकूण ३ हजार ४२३ कारखाने आहेत. त्यापैकी धोकादायक लाल श्रेणीतील काराखाने ९३९ असूने त्यात मोठे कारखाने २९२, मध्यम ६२, तर लहान कारखाने ५८५ आहेत. मोठे कारखाने १५५, मध्यम ५९, तर लहान कारखाने १ हजार ०२९ आहेत. हिरव्या श्रेणीतील मोठे ५६, मध्यम ४३, तर लहान कारखाने ९३६ आहेत. उर्वरित २०६ कारखाने धवल श्रेणीत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »