साखर निर्यातबंदी न उठवल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष – पवार

पुणे: साखर निर्यातीवरील बंदी उठवावी आणि इथेनॉल मिश्रणावरील मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली असून, सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करू, असा इशाराही दिला आहे.
पवार हे बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. “केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. साखर निर्यात केली तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळतो. परंतु या सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे आणि इथेनॉल मिश्रणावर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे साखर कारखान्यांना कमी उत्पन्न मिळाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे, तर दुसरीकडे शेतीमालाचा खर्च वाढला आहे. पुरवठा साखळीत दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहून आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली आहे. याबाबत पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील अशी मला आशा आहे; अन्यथा, आम्हाला लोकशाही मार्गाने आवश्यक पावले उचलावी लागतील. यासाठी मला शेतकऱ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.
साखरेची एम एस पी ४७ रुपये करणे अपेक्षित आहे; त्याशिवाय कच्चा माल उत्पादक शेतकऱ्यांना, साखर कामगार यांना योग्य मोबदला देता येणे अशक्य.
खरे आहे, लवकर निर्णयाची अपेक्षा आहे.