साखर निर्यात परवानगीच्या वृत्ताने स्टॉक मार्केटमध्ये शेयरचे दर वाढले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आणखी दहा लाख टन साखर निर्यात करण्याची टन साखर निर्यातीस परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने, गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर साखर कंपन्यांचे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढले.

बलरामपूर चिनी मिल्स, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज, अवध शुगर अँड एनर्जी, दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज, उत्तम शुगर मिल्स, श्री रेणुका शुगर्स आणि विश्वराज शुगर इंडस्ट्रीज 3 टक्क्यांपासून 9 टक्क्यांच्या दरम्यान वाढले.

सरकारने 1 जूनपासून साखर निर्यातीवर निर्बंध लादल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत साखरेच्या शेयरची बाजारात 20 ते 35 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली आहे. त्यामुळे ही ताजी घडामोड दिलासादायक आहे. साखर उद्योगाचे वर्ष येत्या सप्टेंबरला संपत आहे. त्याआधी 10 लाख साखर निर्यातील परवानगी मिळू शकते असे ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटले आहे.

याशिवाय, पुढील हंगाम पाहता 6 ते 7 दशलक्ष टन निर्यात करण्यासाठी साखरेचे उपलब्ध होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »