‘स्वामी समर्थ’ची चावी सत्ताधार्‍यांकडे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विरोधकांचे डिपॉझिट जप्त; अन्य दोन जागा रिक्त


अक्कलकोट : येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाची सत्ता कायम राहिली. विरोधकांचे मात्र डिपॉझिट जप्त झाले आहे. १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या.

निवडणूक लागलेल्या उर्वरित सहा जागांसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. सोमवारी येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी झाली. यात सत्ताधार्‍यांचे उमेदवार निवडून आले. तर दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.

सहकारी संस्था गटातून संजीव पाटील यांनी ४२ पैकी ४१ मते मिळवित विजयी झाले, तसेच महानंदा निंबाळ ५१७७, गिरिजा विजापुरे ७१००, शिवप्पा बसरगी ७३०६, मल्लिकार्जुन बिराजदार ७३४०, भरमनाथ घोडके ४३२९ मते घेऊन विजयी झाले आहेत.


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक किरण गायकवाड यांनी काम पाहिले. सहायक म्हणून श्याम दडस, विद्याधर माने यांनी काम पाहिले.

विरोधकांना अवैध मतांपेक्षा कमी मते

  • या निकालात माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांना ५०० मते मिळाली. बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश दुपारगुडे, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, स्वामी समर्थ बँकेचे माजी संचालक प्रशांत गुरव या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तर अवैध मते २०० आहेत. काही जणांना अवेध मतांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. वागदरी, सुलेरजवळगे या गटातील दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »