शरद साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याना 21 टक्के बोनस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

24 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न

कोल्हापूर – शरद सहकारी साखर कारखान्यात 26 सप्टेंबर 2025 रोजी 24 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व आदित्य पाटील यड्रावकर, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक तसेच शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्ते, तोडणी वाहतूक कंत्राटदार, शेतकरी, कामगार कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री. आप्पासाहेब चौगुले व श्री. रावसो कुंभोजे तसेच कारखान्याचे कर्मचारी श्री. नागेश भोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते होम हवनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना कारखान्याचे नुतनिकरण करत असताना कारखान्याचा आढावा घेतला व वेळेत पूर्ण करून गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करून 8 लाख क्रशिंग करण्याचे जाहीर केले. तसेच कामगार कर्मचारी, अधिकारी यांना दिवाळी निमित्त 21% बोनस जाहीर केला.

यावेळी कार्यक्रमाचे आभार मानत असताना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. उदय भंडारी यांनी कामगारांना 21% बोनस जाहीर केलेबद्दल आभार मानून कामगारांचा संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवला जाईल असे आश्वासन दिले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »