पाच हार्वेस्टरची खरेदी, ‘पांडुरंग’चा हंगाम वेगवान होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ साठी पाच ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) खरेदी केली. त्यांचे पूजन वाखरी (ता. पंढरपूर) येथील प्रशासकीय कार्यालयासमोर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक म्हणाले, कारखान्यास पूर्वी बीड, नगर, जालना नंदूरबार जिल्ह्यातील तोडणी मजूर मिळत होते. परंतु सध्या ऊसतोडणी मजूर मिळणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे गाळप क्षमतेने कारखाना चालवण्याच्या दृष्टीने एस. फार्म कंपनीची पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, ऊस तोडणी मशिनमुळे कारखान्यास प्रति दिन ५०० मे टनाचा जास्तीचा ऊस पुरवठा होईल. कारखान्याने ऊस तोडणी यंत्रे खरेदी करणे आवश्यक असल्याने आज कारखान्याने प्राथमिक स्वरूपात पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. यानंतरही गरजेप्रमाणे ऊस तोडणी यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय व्यवस्थापन घेईल. हंगामाच्या सुरुवातीपासूनच तोडणी यंत्रे काम करणार असून कारखान्याच्या पूर्ण क्षमतेप्रमाणे ऊसाचा पुरवठा केला जाणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सीताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदींस कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »