वारणा कारखान्यात ऊस वजनात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वारणानगर : वारणा सहकारी साखर कारखान्यात ऊस वजनात तफावत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील पन्हाळा तालुक्यातील एका ऑपरेटरवर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहील लक्ष्मण वकटे (वय २०, रा. काखे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. यासंदर्भात वारणा कारखान्याचे शिफ्ट सुपरवायझर रोहन बाबासो काईंगडे (रा. कोडोली) यांनी कोडोली पोलिसांत फिर्याय दाखल केली आहे. अधिक तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पाटील करीत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी काईंगडे हे वारणा साखर कारखान्यात शिफ्ट सुपरवायझर म्हणून नोकरीस आहेत, तर आरोपी साहील लक्ष्मण वकटे हा कंत्राटी स्वरूपात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरीस आहे. काखे येथील संदीप प्रभाकर गायकवाड यांच्या ताब्यातील वाहनातून तो ऊस भरून घेऊन वारणा कारखान्यात गाडीतळावर आला होता. अंगत ट्रॉलीमध्ये रामचंद्र वकटे यांचा ऊस होता, तसेच पाठीमागील बाजूची चारचाकी ट्रॉलीमध्ये कमल भीमराव देसाई (रा. काखे) यांच्या मालकीचा ऊस होता.

आरोपी साहील वकटे याने सदर वाहनांच्या दोन्ही ट्रॉली वेगळी असताना, एकत्रित वजन घेऊन एकूण २०.८९० टन, तसेच निव्वळ उसाचे वजन १६.७२१ असे चुलते रामचंद कोंडिबा वकटे यांच्या नावे वजन घेतले. त्याच वाहनाच्या पाठीमागील बाजूच्या चारचाकी ट्रॉलीत कमल भीमराव देसाई (रा. काखे) यांच्या मालकीचा ऊस असून, त्याचे वजन ९.९८० टन, तसेच निव्वळ उसाचे वजन ७.६५३ असे वजन घेतले आहे, तरी संदीप गायकवाड (रा. काखे) यांच्या वाहनामध्ये असणाऱ्या उसाच्या वजनात एकूण ९.८८० टन वजनाची तफावत करून एकूण ३५ हजार १४ रुपये इतक्या किमतीची वारणा साखर कारखान्याची फसवणूक केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »