येडेश्वरी कारखाना परिसरात अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

खासदार बजरंग सोनवणे यांची घोषणा

केज: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत लोकनेते अजित पवार यांचे ‘भव्य आणि दिव्य’ स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार हे माझे राजकीय वडील होते. १९९२ पासूनचा स्नेह आणि १९९९ पासून माझी झालेली राजकीय जडणघडण यामध्ये दादांचे मोलाचे योगदान आहे, अशा भावना खासदार सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

येडेश्वरी साखर कारखान्याच्या उभारणीत अजित पवार यांचा मोठा वाटा असल्याने, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी कारखान्याचा प्रांगणातच हे स्मारक उभारले जाणार आहे. दादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत असताना खासदार सोनवणे भावनावश झाले होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर चौरे, अमर देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

२१ सदस्यांची समिती : स्मारकाच्या कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी २१ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे स्वतः या समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »