उसाच्या ट्रॉलीखाली दबून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

म्हसवड: कुकुडवाड-मायणी रस्त्यावर ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची पिन निघून दोन ट्रॉली उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कुकुडवाडपासून दीड किलोमीटर अंतरावर घडली. सूरज संजय माने (रा. म्हसवड) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जखमीला कोणतीही मदत न करता ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला.असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

भारत विठ्ठल शिंदे (रा. ढाकणी) हा चालक उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन ट्रॅक्टरने (क्र. MH 11 BZ 1360) जात होता. अचानक ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीची पिन निखळली आणि दोन्ही ट्रॉली रस्त्यावर उलटल्या. यावेळी मागून दुचाकीवरून येणारे सूरज माने या ट्रॉलींखाली चिरडले गेले. ते खटाव तालुक्यातील माण ॲग्रो शुगर कारखान्यात कामाला जात असताना हा अपघात घडला. याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ धीरज संजय माने याने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक भारत शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »