मांजरा शुगर इंडस्ट्रीजमध्ये हरित ऊर्जेचा नवा अध्याय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : हरित ऊर्जा धोरणानुसार पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस चालना देण्यासाठी मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) येथे १० टीपीडी क्षमतेच्या सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, तसेच जॅक्सन ग्रीन व अल्टानोवा बायो एनर्जीचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये उत्पादित झालेल्या १२ पोत्यांचे पूजन करण्यात आले. चालू हंगामात कारखान्याने उच्चांकी गळीत करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून धाराशिव जिल्ह्यात साखर उताऱ्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कार्यक्रमात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांचा सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी शेतकरी व कारखाना यांच्यातील दृढ नात्याचा उल्लेख करत, परस्पर विश्वासामुळेच कारखान्याची प्रगती शक्य झाल्याचे सांगितले.

या सोहळ्यास कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »