‘अगस्ती’चे संचालक वाकचौरे यांचा राजीनामा अखेर मंजूर

नगर – अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळातून अकोले गटातून निवडून आलेले संचालक कैलासराव वाकचौरे यांनी सादर केलेला राजीनामा मोठ्या प्रतीक्षेनंतर मंजूर करण्यात आला आहे.
या रिक्त पदासाठी साखर आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

कैलासराव वाकचौरे यांनी अकोले पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष यासारखी विविध अशी अनेक पदे भूषविली आहेत. अकोले नगरपंचायत निवडणुकीत वाकचौरे यांच्यामुळे भाजपची बहुमताने सत्ता आली. पण नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीनंतर त्यांनी पिचड पिता-पुत्रांची साथ सोडली.
अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत आ. डॉ. लहामटे, यांना यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, जि.प चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळातून ते विजयी झाले होते. उपाध्यक्ष पदासाठी ते प्रमुख दावेदारही होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार अशोकराव भांगरे उपाध्यक्षपदाची देण्यात आली. संधी भांगरे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कारखान्याच्या उपाध्यक्षपदीही त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांना संधी देण्यात आली.
उपाध्यक्षपद त्यांना न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. आपले राजीनामापत्रही त्यांनी कार्यकारी संचालकांकडे दिले होते. मध्यंतरी त्यांनी राजीनामा परत घ्यावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र संबंधितांना त्यात यश आले नाही. आता त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे