निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर अभिनंदन पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेळगाव : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष, साखर व्यवसायातील उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची बेळगाव येथील नामवंत एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे.

सन २०२४-२५ ते २०२८-२९ या सालासाठी ही निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी एम. एन. मणी यांनी सांगितले. चिक्कोडी तालुक्यातील जैनापुर येथील अरिहंत शुगर्स या साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिनंदन पाटील त्यांनी साखर उद्योगात पदार्पण केले. कारखान्यासाठी त्यांनी काटकसरीने नियोजन करून सर्व हंगाम यशस्वी केले.

रामदुर्ग तालुक्यातील उदपूडी येथील शिवसागर शुगर कारखाना घेऊन व घटप्रभा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या सदस्यपदी अभिनंदन पाटील यांची सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »