ॲग्रीकॉस क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. अनंत चोंदे
पुणे : ॲग्रीकॉस स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड पुणे च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीमध्ये ॲड. अनंत जगन्नाथ चोंदे यांची अध्यक्षपदी व नामदेव भालचंद्र चिंतामण यांची उपाध्यक्षपदी एकमतानी निवड झाली. संस्थापक संचालक शेखर गायकवाड यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व फक्त कृषी पदवीधरांसाठी देशातील पहिली अग्रीकॉस क्रेडिट को-ऑपरेटीव सोसायटीची स्थापना राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरीक्त महासंचालक, श्री शेखर गायकवाड IAS यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व कृषी पदवीधरांच्या सहकार्याने करण्यात आली. सदर संस्थेची प्रथम सर्वसाधारण सभा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पुणे शहर उपनिबंधक संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपंन्न झाली.
नवनिर्वाचित संचालक मंडळ निवड सर्वसाधारण सभेने खालील प्रमाणे केली.
१)शेखर नारायण गायकवाड – पुणे. २)ॲड.अनंत जगन्नाथ चोंदे – लातूर.
३ )नामदेव भालचंद्र चिंतामण – सोलापूर ४)सुनिल गोविंदराव पवार – नाशिक
५)अजित ब्रम्हनाथ चौगुले – कोल्हापूर ६)डॉ. वंदन कृष्णराव मोहोड- अकोला
७)शिवानी दिलीप खंडार – अमरावती ८)डॉ. रजनीगंधा सचिन येवले – परभणी
९)दिलीप ज्ञानदेव काशीद – मुंबई १०)किशोर बाबुराव डेरे – पुणे
११)युवराज मानिकराव पाटील – नांदेड १२)ॲड.शिरीष उदधवराव यादव – लातूर
१३)गोविंद दगडुबा गिते – बीड १४)पुडलिंक विश्वंबर कदम – नांदेड
१५) बंजरंग उध्दवराव मंगरुळकर – धाराशिव.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहयोगाने, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, संपुर्ण राज्यातील कृषि पदवीधर भगिनी व बंधू यांच्या सहकार्याने नोंदणी व स्थापना झाली. शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून कृषी पदवीधर घटक समोर ठेवून व सर्वांच्या हितासाठी कार्य करण्यास संस्था कटीबद्ध राहिल असा विश्वास व निर्धार नवनिर्वाचित संचालक मंडळाने व्यक्त केला.
सदर संस्थेच्या उभारणीसाठी सहकार आयुक्त दिपक तावरे, उपनिबंधक मिलिंद सोबले, दादासाहेब झगडे, डॉ. रामकृष्ण मुळे, यशवंत खैरे, दादाराम सप्रे, ईश्वर भटेवरा, सुरेश भावे, अजित आरेंजा, सोपान कांचन, यतिंद्र जोशी, मधुसुदन परांजपे, रविंद्र पवार, रविंद्र माने, यशवंत काळे, पांडूरंग बोरगावकर, डॉ. तुकाराम मोटे, मधुकर बोडखे, राम भरकड, आशिष बिरादार, एन. डी. राठोड, भासकर देशमुख, संजय बंटेवाड, विष्णू भोजे व राज्यातील असंख्य कृषी पदवीधर अधिकारी, उदयोजक भगिनी बंधूनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.